देव तारी त्याला कोण मारी! कॅन्सर झालेल्या बैलाचे शिंग काढले अन् प्राण वाचले, सोलापुरातील घटना, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शेतकरी राजा आणि बैल यांचं अतूट नातं आपण आज पाहणार आहोत. बैलाला कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आल्याने लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेत चार तास ऑपरेशन करत शिंग कापून काढले. यामुळे बैलाचे प्राण वाचले.
सोलापूर :- वाद-विवादामुळे माणसाला नातं फार काळ टिकवता येत नाही. बोलता येत असताना सुद्धा नातं टिकवायला तो अपयशी ठरतो. मात्र, शेतकरी राजा आणि बैल यांचं अतूट नातं आपण आज पाहणार आहोत. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात राहणाऱ्या सिद्धाराम भोसले यांच्या बैलाच्या शिंगातून पू येणे, शिंग हलणे असा त्रास होत होता. या बाबत ॲनिमल राहतच्या डॉक्टरांना याची माहिती दिली. त्यात बैलाला कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेत चार तास ऑपरेशन करत शिंग कापून काढले. यामुळे बैलाचे प्राण वाचले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या गावात राहणारे सिद्धाराम भोसले यांच्याकडे एकच बैल आहे. तो बैल वृद्ध झाल्याने त्याला शेतकामाला जुंपत नव्हते. पण त्यांच्या आरोग्याची काळजी नेहमी सिद्धाराम भोसले हे घेत होते. बैलाला अनेक दिवसांपासून वैरण खाता येत नव्हती, बैलाची शिंगे खाली वाकली होती, शिंगातून रक्त येत होते, शिंगातून पू येत होता, वास येत होता. त्या बैलाचा त्रास पाहावेसा न झाल्याने याबाबतची माहिती भोसले यांनी ॲनिमल राहत या संस्थेला दिली. माहिती मिळताच अजित मोठे यांनी पाहणी केली.
advertisement
घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जाधव यांच्याबरोबर संपूर्ण बैलाची आणि शिंगाची पाहणी केली. डॉ.जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गुरुवार 10 एप्रिल रोजी चार तास सर्जरी करीत शिंग कापून काढले. यासाठी डॉ. आकाश जाधव, भीमा शंकर, गणेश जावीर आणि बैल मालक भोसले यांनी परिश्रम घेतले. ॲनिमल राहत या संस्थेकडून या बैलाचे ऑपरेशन मोफत करण्यात आले आहे. ऑपरेशन झाल्यावर बैल मालक सिद्धाराम भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.
advertisement
अशी घ्या बैलांची काळजी घ्या
बैलाच्या मालकांनी शिंगे तासू नये, शिंगाला कलर लावू नये. यामुळे बैलाच्या होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करा, तंदुरुस्त आणि सुरक्षित ठेवा आणि कॅन्सरपासून बचाव करा, असे आवाहन ॲनिमल राहतचे डॉ. आकाश जाधव यांनी केले. तसेच कोणताही जनावरास इजा झाल्यास किंवा जखमी झाल्यास अवस्थेत दिसल्यास तात्काळ राहत ॲनिमलचे संपर्क साधावे असे आवाहन डॉ.आकाश जाधव यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 14, 2025 5:38 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
देव तारी त्याला कोण मारी! कॅन्सर झालेल्या बैलाचे शिंग काढले अन् प्राण वाचले, सोलापुरातील घटना, Video