उगाच खर्च करू नका! काही मिनिटांत मोबाईलवरुन करा जमिनीची मोजणी, प्रक्रियेची A TO Z माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : आपल्या मोबाईलचा वापर केवळ कॉल, सोशल मीडिया किंवा इंटरनेटसाठीच नाही, तर शेतीतील अनेक कामांसाठीही होऊ शकतो.
मुंबई : आपल्या मोबाईलचा वापर केवळ कॉल, सोशल मीडिया किंवा इंटरनेटसाठीच नाही, तर शेतीतील अनेक कामांसाठीही होऊ शकतो. आज आपण पाहूया की मोबाईलच्या मदतीने स्वतःच आपलं शेताचं क्षेत्रफळ कसं मोजता येईल. तेही कोणत्याही तज्ञाच्या मदतीशिवाय, अगदी काही मिनिटांत.
शेत मोजण्यासाठी काय करावे लागेल?
सुरुवातीला आपल्या शेताचं आकारमान लक्षात घ्या. बहुतांश शेतजमिनी पूर्णपणे चौकोनी किंवा आयताकृती नसतात, पण उदाहरणार्थ एखादं चौकोनी शेत गृहीत धरा. धरण्यात आलेल्या शेताच्या चार बाजूंचं मोजमाप खालीलप्रमाणे आहे.
पहिली बाजू : ४५० फूट
दुसरी बाजू : ४०० फूट
तिसरी बाजू : ३२० फूट
चौथी बाजू : ३०० फूट
advertisement
ही मोजमापं फूट, मीटर किंवा गज यापैकी कोणत्याही एककात घेऊ शकता. सर्व मोजमापं नीट लिहून ठेवा. यानंतर त्या जमिनीच्या मध्यभागी एक रेषा (आडवी किंवा उभी) काढा. ती दोन भागांमध्ये विभागेल. त्या रेषेचंही मोजमाप घ्या. हे मोजमाप पुढे मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवर वापरणं सोपं जाईल.
मोबाईलवर शेताचं क्षेत्रफळ कसं काढायचं?
आपल्या मोबाईलवर सर्च ब्राऊझर (Google, Chrome इ.) उघडा. सर्च बारमध्ये “Plot Area Calculator” असं टाइप करा. पहिल्याच काही निकालांमध्ये “Plot Area Calculator” नावाची वेबसाईट दिसेल.
advertisement
त्या लिंकवर क्लिक करा. पुढील विंडोमध्ये मोजमाप भरण्याची जागा दिसेल.
वेबसाईटवर माहिती कशी भरायची?
"Area of Triangle" किंवा "Area of Quadrilateral" या पर्यायाखालील फॉर्ममध्ये आपली चारही बाजू आणि मध्यरेषेचं माप भरा.
आपण फूटनिहाय मोजमाप घेतले असल्यास “Feet” हा पर्याय निवडा.
सर्व मापे टाकल्यानंतर “Calculate Area” या बटणावर क्लिक करा.
काही सेकंदातच स्क्रीनवर आपल्या शेताचं संपूर्ण क्षेत्रफळ दिसेल. हे मोजमाप फूट, मीटर, चौरस मीटर किंवा एकर अशा विविध एककांमध्ये पाहता येईल.
advertisement
याचा फायदा काय?
या पद्धतीने शेतकरी स्वतःच जमिनीचं अचूक मोजमाप करू शकतो.
सर्वेक्षकावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होते.
जमिनीचा वापर, सिंचन नियोजन, आणि पिकांनुसार विभागणी अधिक प्रभावीपणे करता येते.
कृषी योजना, कर्ज अर्ज किंवा सरकारी नोंदींसाठी आवश्यक असलेले क्षेत्रफळ त्वरित मिळवता येते.
एकूणच, आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे. त्याचाच वापर करून शेतकरी आपल्या जमिनीचं मोजमाप अचूकपणे आणि मोफत करू शकतो. इंटरनेटवरील साध्या साधनांचा उपयोग करून डिजिटल पद्धतीने शेतमोजणी करणे हे शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग ठरू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 9:07 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
उगाच खर्च करू नका! काही मिनिटांत मोबाईलवरुन करा जमिनीची मोजणी, प्रक्रियेची A TO Z माहिती


