शेतकऱ्यांची चिंता वाढली, निर्यात शुल्क हटवूनही कांद्याच्या दरात मोठी घसरण, काय मिळतोय भाव?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
केंद्र सरकारने नुकताच कांद्याच्या निर्यातीवर असलेला 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करून ही कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांनी मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
सोलापूर : केंद्र सरकारने नुकताच कांद्याच्या निर्यातीवर असलेला 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करून ही कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांनी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी कांद्याला 1 हजार रुपये ते 1200 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. या संदर्भात अधिक माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली आहे.
कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या सोलापूर बाजार समितीत कांदा विक्रमी आवक असते. दरवर्षी 300 ते 500 ट्रक कांद्याची आवक असते. पण आतापर्यंत कांद्याची आवक 100 गाड्यांपर्यंत आली आहे. शासनाने निर्यात शुल्क कमी करून सुध्दा कांद्याचे दर कमी झाले आहे.
advertisement
यामुळे शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले आहे. तसेच इतर राज्यामध्ये सुद्धा कांद्याची मागणी कमी झाली आहे. तर आज सरारासी कांद्याला 10 रूपये किलो ते 12 किलो दर मिळत आहे. तर क्वचित एखाद्या चांगल्या कांद्याला 15 रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहे. ज्या वेळेला कांद्याला जास्त मागणी होती त्यावेळी शासनाने निर्यात शुल्क लागू केले होते आता कांद्याला मागणी नसताना कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले आहे. त्यामुळे शेतकरी सह व्यापारी सुद्धा संकटात सापडले आहे.
advertisement
कांद्याला दर चांगला मिळतो, या विश्वासाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांदा पिकवला आहे. मात्र, दरच कोसळल्याने केलेला खर्चही निघत नसल्याची खंत माढा तालुक्यातील शेतकरी भगवान जनार्दन देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 07, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांची चिंता वाढली, निर्यात शुल्क हटवूनही कांद्याच्या दरात मोठी घसरण, काय मिळतोय भाव?