कडकनाथ सोडा, ही काळी कोंबडी देतेय सोन्याची अंडी, शेतकऱ्याची वर्षाची उलाढाल 20 लाख!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Poultry farming: सोलापुरातील शेतकऱ्याने काळ्या रंगाच्या ऑस्ट्रेलियन जातीच्या कोंबड्या पाळल्या आहेत. यातून ते वर्षाला 20 लाखांची उलाढाल करत आहेत.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर – सध्याच्या काळात शेतीसोबतच शेतीपुरक व्यवसायातून देखील काही शेतकरी चांगली कमाई करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्दचे शेतकरी अरुण शिंदे यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या 5 वर्षांपासून प्रोशक्ती ऍग्रो फार्ममध्ये ब्लॅक ओस्ट्रोलॉर्प जातीच्या कोंबड्या त्यांनी पाळल्या आहेत. कडकनाथ सारखी काळ्या रंगाची असणारी ही जात मूळची ऑस्ट्रेलियाची असून चिकन व अंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या कुक्कुटपालनातून शिंदे हे वर्षाला 15 ते 20 लाखांची उलाढाल करत आहेत.
advertisement
मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे प्रोशक्ती ऍग्रो फार्माचे अरुण शिंदे हे गेल्या 5 वर्षापासून ब्लॅक ओस्ट्रॉलोर्प जातीचं कुक्कुटपालन करत आहेत. यासाठी त्यांनी कोल्हापुरातून प्रशिक्षण घेतलं. मूळची ऑस्ट्रेलियन असणारी ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ ही कोंबड्यांची सुधारित जात आहे. मांस आणि अंडी उत्पादन या दोहोंसाठी हा पक्षी फायदेशीर ठरत आहे. सध्या शिंदे यांच्याकडे ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प या जातीच्या 200 मादी कोंबडी असून त्यापासून दिवसाला 160 ते 170 अंडी मिळतात.
advertisement
एका अंड्याला 15 ते 17 रुपये भाव
या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत 15 ते 17 रुपये पर्यंत आहे. या अंड्याला खाण्यासाठी नव्हे तर नवीन पिले तयार करण्यासाठी मोठी मागणी असते. तसेच या जातीचा कोंबडा अडीच ते तीन महिन्यात सव्वा किलो होतो. ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प या कोंबड्यांचे मांस 180 रूपये किलो ते 200 किलो या दराने विक्री होते. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढविण्याचा पर्याय म्हणून अरुण शिंदे यांनी या ‘ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प’ कोंबडीचं पालन करत आहेत. ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प यांच्या अंडी तसेच चिकन विक्रीतून ते वर्षाला 15 ते 20 लाखांची उलाढाल करत आहे.
advertisement
ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्पची वैशिष्ट्ये
कडकनाथ प्रमाणे कोंबडीचा काळा रंग असला, तरी डोक्यावरचा तुरा लाल रंगाचा असतो. ही ऑस्ट्रेलियन वंशाची सुधारित गावठी कोंबडी आहे. परसबाग आणि पोल्ट्री फार्म (बंदिस्त) दोन्ही प्रकारे या पक्षाची वाढ उत्तम होते. परसबागेत पालन केल्यास अडीच महिन्यात सव्वा किलो किंवा त्यापेक्षाही जास्त वजन होते. साडेचार ते पाच महिन्याचा पक्षी झाला की अंडी देणे सुरू करतो. जर आपल्याकडे या जातीचे 200 पक्षी असेल तर दिवसाला 160 ते 170 अंडी मिळतात. दोन ते अडीच पक्षी मांसासाठी वापरता येतो. मांसाची चवही रुचकर असते, असं शिंदे सांगतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 06, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
कडकनाथ सोडा, ही काळी कोंबडी देतेय सोन्याची अंडी, शेतकऱ्याची वर्षाची उलाढाल 20 लाख!