Amla Farming : सव्वा एकरात लागवड, वर्षाला 3 लाख कमाई, शेतकऱ्यानं अशी केली आवळा शेती यशस्वी! Video

Last Updated:

Amla farming : सव्वा एकराला आवळा शेती करण्यासाठी 80 ते 1 लाख रुपये खर्च येत असून या आवळा विक्रीतून तरुण शेतकरी अभय चौरे 2 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहेत.

+
News18

News18

सोलापूर : औषधी आणि गुणकारी फळ म्हणून आवळा सर्वांनाच माहिती आहे. या आवळ्याची शेती मोहोळ तालुक्यातील पेनुर या गावातील तरुण शेतकरी अभय हरिदास चौरे करत आहेत. अभय यांचे वडील हरिदास यांनी 32 वर्षांपूर्वी सव्वा एकरात आवळा बागेची लागवड केली आहे. सव्वा एकराला आवळा शेती करण्यासाठी 80 ते 1 लाख रुपये खर्च येत असून या आवळा विक्रीतून तरुण शेतकरी अभय चौरे 2 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहेत.
अभय चौरे यांचे वडील हरिदास चौरे यांनी 32 वर्षांपूर्वी या आवळा बागेची लागवड केली आहे. सुरुवातीला आवळा बागेची लागवड केल्यावर 5 वर्षांपर्यंत आवळा बागेला फळधारणा होत नाही. सव्वा एकरात 22 बाय 22 या अंतरावर आवळा झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकरी आवळा बागेत आंतरपीक सुद्धा घेऊ शकतात.
advertisement
आवळा झाडांवर बुरशी रोगाचे प्रमाण जास्त असते पण उन्हाळ्यात त्याचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे झाडांची पाहणी करून वेळोवेळी स्प्रे फवारणी करावी लागते. आवळ्याला ऑफ सीझनमध्ये 50 रुपये ते 120 रुपये किलो प्रमाणे दर मिळतो. तर सीझनमध्ये 10 रुपयांपासून ते 50 रुपये किलो पासून दर मिळतो. चौरे यांनी सव्वा एकरामध्ये N7 या जातीच्या आवळ्याची लागवड केली आहे.
advertisement
अभय चौरे यांच्या आवळा बागेला सव्वा एकरासाठी बुरशीनाशक फवारणी, खत असे मिळून 80 ते 1 लाख रुपये खर्च येतो. तर सर्व खर्च वजा करून तरुण शेतकरी अभय चौरे हे वर्षाला 2 ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न या आवळा बागेतून घेत आहेत. आवळा शेती करायची  असेल तर पहिले पाच वर्ष संयम ठेवावा लागतो त्यानंतर आवळाच्या झाडांना फळधारणा सुरुवात होते. संयम ठेवून हे शेती केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असा सल्ला तरुण शेतकरी अभय चौरे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/कृषी/
Amla Farming : सव्वा एकरात लागवड, वर्षाला 3 लाख कमाई, शेतकऱ्यानं अशी केली आवळा शेती यशस्वी! Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement