सोलापुरात अवकाळीचा फटका, कलिंगडची बाग झाली उद्ध्वस्त, शेतकऱ्याला अश्रू अनावर, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
या बागेसाठी त्यांना एक लाख रुपयापर्यंत खर्च आला होता. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या कलिंगडची बाग अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मातीमोल झाली आहे.
सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यात गेल्या मागील तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरास या गावातील शेतकरी मोतीबुवा गोसावी यांची कलिंगडची बाग उद्ध्वस्त होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.
बार्शी तालुक्यातील राळेरास गावातील शेतकरी मोतीबुवा गोसावी यांनी एका एकरात कलिंगडची लागवड केली होती. या बागेसाठी त्यांना एक लाख रुपयापर्यंत खर्च आला होता. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या कलिंगडची बाग अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मातीमोल झाली आहे. पावसामुळे सगळं पीक उद्ध्वस्त झालं आहे. कलिंगडच्या बागेसाठी जो खर्च केला होता, तोसुद्धा खर्च सुद्धा आता निघाला नाही. एवढे पैसे टाकून,खर्च करून काही उपयोगच झाला नाही, असं सांगताना शेतकरी मोतीबुवा गोसावी यांचे अश्रू अनावर झाले आहेत.
advertisement
उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. वर्षातून एकदाच या फळाला मोठी मागणी असते, त्यामुळे याच हंगामात त्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, अवकाळी पावसामुळे टरबूजाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत असून, सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी मोतीबुवा गोसावी केली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 05, 2025 5:29 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
सोलापुरात अवकाळीचा फटका, कलिंगडची बाग झाली उद्ध्वस्त, शेतकऱ्याला अश्रू अनावर, Video