सोलापूर : शेतीचे योग्य नियोजन केल्यास कमी क्षेत्रात ही वर्षाला लाखो रुपयांचा उत्पन्न घेता येते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगा गावातील माणिक बाबुराव विधाते यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. दीड गुंठ्यात पानमळातून वर्षाला 3 ते साडे तीन लाख रुपयांचे उत्पन्न ते घेत आहेत.
आगळगाव गावातली शेतकरी माणिक बाबुराव विधाते हे गेल्या 25 वर्षांपासून पानमळ्याची शेती करत आहे. माणिक विधाते यांच्या पानमळ्यात बारा महिने यांच्या शेतात पाने असतात. पानमळ्यात बारा महिने पान असल्यामुळे उत्पन्न देखील चांगला मिळत आहे. पानमळा लावत असताना मशागत करून दोन ते तीन कगाड्या गावखत वापरून पानमळ्याची लागवड केली आहे.
advertisement
दहावी पास तरुण शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकराच्या शेतीत कमावला 8 लाखांचा नफा
माणिक विधाते यांनी पानमळ्याची लागवड चार बाय चारवर केली आहे. पानमळ्याची शेती करताना कुठल्याही प्रकारची रासायनिक खताची आवश्यकता नसते. त्या पानमळ्याला फक्त गावखत आणि शेणखताची आवश्यकता असते. शेतकरी माणिक विधाते यांनी गावरान पाण्याची लागवड केली असून कळीचा पान आणि पापड्याच्या पानाची लागवड त्यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात माणिक विधाते यांनीच फक्त पानमळ्याची शेती केली आहे. सध्या पाणमळाची शेती दुर्मिळ होत चालली असून गेल्या 25 वर्षांपासून माणिक विधाते हे पानमाळ्याची शेती करत आहेत. सरासरी वर्षाला दीड गुंठ्यात शेतकरी विधाते 3 ते साडे तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. महत्त्वाचा म्हणजे या पानाची तोडे करून स्वतः शेतकरी माणिक विधाते हे बाजारामध्ये ते विक्री करतात.





