शहरात राहून शेती फायदेशीर कशी करायची?
आज मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या युगात शेतीवर लक्ष ठेवणं खूप सोपं झालं आहे. ड्रिप सिंचन प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन सर्वेक्षण आणि ‘स्मार्ट फॉर्मिंग’ तंत्रज्ञानामुळे शहरातूनही शेतीवर नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे दररोज शेतात जाण्याची गरज राहत नाही.
याशिवाय, अनेक सरकारी योजना, कृषी प्रशिक्षण केंद्रे आणि ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध असल्याने नवीन शेती पद्धती शिकणं सहज शक्य झालं आहे.
advertisement
कोणती पिकं देतील जास्त नफा?
जर शहरात राहून शेती करायची असेल, तर कमी मेहनत, पण जास्त उत्पादन देणारी पिकं निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
भाजीपाला शेती: टोमॅटो, मिरची, भेंडी, वांगी किंवा काकडी ही पिकं कमी कालावधीत उत्पादन देतात.
फुलशेती: शेवंती, झेंडू, गुलाब किंवा जरबेरा ही पिकं पॉलीहाऊसमध्ये घेतल्यास मोठा नफा मिळतो.
औषधी शेती: अश्वगंधा, तुळस, कोरफड, सफेद मुसळी यांसारख्या हर्बल पिकांची मागणी सतत वाढत आहे.
फळझाडं: डाळिंब, पेरू, आंबा किंवा चिकू यांसारख्या फळबागा दीर्घकालीन उत्पन्न देतात.
नवीन पद्धतीचा वापरा
शहरात राहून शेती फायदेशीर बनवायची असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचन प्रणाली वापरा. पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊस तयार करा, ज्यामुळे हवामानाचा परिणाम कमी होतो. सेंद्रिय खतं आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करा. ऑनलाईन मार्केटिंगद्वारे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचा. असं नियोजन केल्यास लाखो रुपयांचं नफा कमावता येईल.
