जनावरांना पूर्वीपासून दिलं जातंय हे फळ
शेतकरी अनेक वर्षांपासून आपल्या दुभत्या जनावरांना ते खाऊ घालतात आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. मोहनपूर गावातील शेतकरी अरविंद कुमार यांनी लोकल 18 ला सांगितले की, आम्ही आमच्या आजोबा आणि वडिलांच्या काळापासून बाभळीचं फळ जनावरांना देण्याची परंपरा पाळत आलो आहोत. जेव्हा हे फळ सहज उपलब्ध होतं, तेव्हा ते गाय आणि म्हैस दोन्हीला खाऊ घालतो.विशेषतः म्हशीला ते दिल्याने तिच्या दुधात वाढ होते. ते पुढे म्हणाले की, याचा वापर पारंपरिक पद्धतीने होत असला तरी, जे नवीन लोक याचा वापर करू इच्छितात त्यांनी प्रथम पशुवैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.
advertisement
मर्यादित प्रमाणात दिल्यास दुग्धोत्पादनात होते वाढ
डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या, पुसा येथील पशुधन विभागात कार्यरत असलेले वैज्ञानिक डॉ. विजय कुमार गोंड यांनी सांगितले की, बाभळीचे फळ पोषक तत्वांनी परिपूर्ण असते आणि ते मर्यादित प्रमाणात दिल्यास दुग्धोत्पादनात मदत करते.ते म्हणाले की, अनेक शेतकरी ते दुभत्या जनावरांना खाऊ घालतात आणि ते फायदेशीर देखील आहे. बाभळीचे फळ सुकवून त्याची पावडर करून घ्या आणि त्यानंतर जनावरांच्या शारीरिक रचना आणि आरोग्यानुसार मर्यादित प्रमाणात ते खाऊ घाला. पशुवैज्ञानिकांनी सांगितले की, हे लक्षात ठेवले पाहिजे की जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते हानिकारक असू शकते, म्हणून जनावरांची मात्रा आणि आरोग्य लक्षात घेऊनच त्याचा वापर करा.
हे ही वाचा : उन्हाळ्यात फिट राहायचंय? तर आहारात घ्या 'ही' भाजी; अनेक गंभीर आजारांपासून व्हाल मुक्त
हे ही वाचा : उन्हात स्मार्टफोन ‘ओव्हरहिट’ होतोय? तर फाॅलो करा 'या' 5 टिप्स, फोन कधीच होणार नाही गरम