TRENDING:

असा योग पुन्हा नाहीच! कार्तिकी एकादशी ५ राशींचे नशीब उजाडणार, सुख समाधानासह मोठा धनलाभ होणार

Last Updated:

astrology news : आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत दशमी तिथी राहील. देवउठणी एकादशी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी सुरू झाली असून ती आज, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी संपेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत दशमी तिथी राहील. देवउठणी एकादशी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी सुरू झाली असून ती आज, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी संपेल. आजचा दिवस धार्मिक आणि शुभ मानला जात असून तुळशी विवाहाचा पवित्र दिवस आहे. या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामाचे लग्न लावले जाते, ज्यातून देवउठणी एकादशीपासून शुभकार्यांना प्रारंभ होतो.
kartiki ekadashi 2025
kartiki ekadashi 2025
advertisement

आज व्याघात योग तयार होत असून पूर्व भाद्रपद नक्षत्र जागृत आहे. तसेच त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचे संयोगही आज लाभदायक ठरणार आहेत. महत्त्वाच्या कामांसाठी अभिजित मुहूर्त ११ वाजून ४२ मिनिटांपासून १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. मात्र, राहूकाल दुपारी ४ वाजून १२ मिनिटांपासून ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असल्याने या काळात कोणतेही नवीन कार्य टाळावे.

advertisement

मेष : आज निर्णयक्षमता सुधारेल आणि नवीन कामात आत्मविश्वास वाढेल. मात्र, अति तिखट पदार्थ टाळा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. नातेवाईकांची भेट घडेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिती स्थिर राहील. सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून वागाल.

वृषभ : आज तडकाफडकी निर्णय घेणे टाळा. शांततेने विचार करून पुढे जा. वाचनातून ज्ञान आणि वैचारिकता वाढेल. मुलांच्या यशामुळे आनंद मिळेल. प्रेमसंबंधातील व्यक्तींना मनमोकळेपणाने आपले विचार मांडता येतील, ज्यामुळे नात्यात गोडवा वाढेल.

advertisement

मिथुन : कामाच्या ठिकाणी तुमचा वरचष्मा राहील. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. कामात सकारात्मक बदल दिसून येतील, पण तात्काळ निर्णय घेणे टाळा. प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराला प्राधान्य द्या.

कर्क : तुमच्या हस्तकौशल्याचे आज कौतुक होईल. प्रगतीच्या दिशेने नवे पाऊल टाकाल. मित्रमंडळींसोबत वेळ छान जाईल. वरिष्ठांवर चांगली छाप पडेल. घरगुती खर्चावर संयम ठेवा आणि अनावश्यक खरेदी टाळा.

advertisement

सिंह : सर्वांशी प्रेमाने वागाल आणि संवादात गोडवा राहील. कामाच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. व्यापारी वर्गाने कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. आवडीचे पदार्थ चाखाल, घरातील वातावरण सुखकर राहील. नोकरदारांना वरिष्ठांकडून मान्यता मिळेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहिती करीता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
असा योग पुन्हा नाहीच! कार्तिकी एकादशी ५ राशींचे नशीब उजाडणार, सुख समाधानासह मोठा धनलाभ होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल