दूध - वास्तुशास्त्रानुसार, सकाळी लवकर आपल्या हातातून दूध खाली सांडणं ही अशुभ घटना मानली जाते. ज्योतिषशास्त्रात, दूध समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक मानले जाते. सकाळच्या वेळी दूध सांडणं म्हणजे संपत्ती, समृद्धी आणि प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते. तसा प्रसंग घडल्यास त्या दिवशी व्यवहार, आर्थिक बाबी आणि वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
advertisement
मीठ - वास्तुशास्त्रानुसार, सकाळी लवकर काही काम करत असताना आपल्या हातातून मीठ खाली पडणं अत्यंत अशुभ मानलं जातं. मीठ हे स्थिरता आणि शांतीशी संबंधित आहे. मीठ हातातून पडून सांडणे म्हणजे वादविवाद, वाढते घरगुती त्रास आणि संयम सुटण्याचे लक्षण मानले जाते. तसं घडल्यास लोकांनी काम करताना संयम राखला पाहिजे.
सूर्यास्तानंतर केलेल्या या गोष्टी जीवनात गरिबीचे कारण; वेळीच सुधारणा आवश्यक
हळद-कुंकू - हळद-कुंकवाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. अनेक विधींमध्ये त्याचा वापर होतो, शिवाय कुंकवाला सौभाग्याचे प्रतिक मानलं आहे. सकाळी हातातून हळद-कुंकू खाली पडणे देखील खूप अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, कुंकवाला वैवाहिक आनंदाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. कुंकवाचा करंडा हातातून खाली पडला तर ते कुटुंबासाठी किंवा विवाहित जीवनासाठी मोठ्या आपत्तीचे संकेत समजावा. असा प्रसंग घडल्यास आपली दैनंदिन कामे अत्यंत सावधगिरीने करावीत. कोणावरही राग बाळगू नका. इतरांच्या वादात पडू नका. संयमाने वागावे.
आरसा - सकाळी हातातून आरसा खाली पडणं हा देखील एक अतिशय अशुभ संकेत मानला जातो. आरसा खाली पडणं म्हणजे घरात वाद, चिंता आणि नातेसंबंधांमध्ये बिघाड अशा गोष्टींचा संकेत. पण, काही धार्मिक श्रद्धांनुसार असेही मानतात की, तुटलेला आरसा तुमच्यावर येऊ शकणारे त्रास आणि अपघात स्वतःवर घेतो. म्हणून ती एक शुभ गोष्ट म्हणून देखील पाहिली जाते.
साडेसाती असो की अडीचकी..! शनिदोषातून सुटका मिळवण्यासाठी ही फुले शनिला अर्पण करा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
