पुष्य नक्षत्र असल्यास त्या दिवशी आपण काही खास उपाय करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी सुख-समृद्धी वाढवायची असेल, तर सोमवारच्या दिवशी पुष्य नक्षत्रात एका कलशात पाणी घेऊन त्यात थोडी साखर मिसळा. हे जल पिंपळाच्या झाडाच्या मुळात अर्पण करा. जल अर्पण करताना 'ऊँ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करा आणि घराच्या सुखासाठी प्रार्थना करा.
advertisement
तुमच्या प्रेम-विवाहात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, तर त्या दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि 'शं ह्रीं शं शनैश्चराय नमः' या शनि मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या अडचणी लवकरच दूर होतील.
सूर्यास्तानंतर केलेल्या या गोष्टी जीवनात गरिबीचे कारण; वेळीच सुधारणा आवश्यक
तुमची मुले तुमच्या प्रत्येक कामात मदत करावीत आणि त्यांच्यासोबत तुमचे संबंध चांगले राहावेत यासाठी सोमवारी भगवान शंकरांना नारळ अर्पण करा आणि सोबत सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवा.
जर तुम्हाला एखाद्या समस्येवर तोडगा काढता येत नसेल, तर सोमवारी पाण्यात थोडे दूध मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. तसेच, 11 बेलाच्या पानांवर चंदनाने 'ॐ' लिहून ते शिवलिंगावर वाहावे आणि धूप-दीप लावून विधीपूर्वक पूजा करावी. यामुळे तुमच्या समस्यांचे निराकरण लवकर होईल.
तुमच्या मनात बऱ्याच दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल, तर सोमवारी स्नान वगैरे झाल्यावर शिवमंदिरात जा. तिथे जाऊन शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करा. त्यानंतर शेंडी असलेला एक कच्चा नारळ भगवान शंकरांना अर्पण करा आणि हात जोडून इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करा. यामुळे तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल.
साडेसाती असो की अडीचकी..! शनिदोषातून सुटका मिळवण्यासाठी ही फुले शनिला अर्पण करा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
