मुंबई : अनेकदा व्यक्ती अथक परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळत नाही. मात्र एकदा का नशिबाचा तारा उजळला, तर आयुष्यच बदलून जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे संयोग व्यक्तीच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवतात. अशाच एका शक्तिशाली युतीची निर्मिती 2026 मध्ये होत आहे. संपत्तीचा कारक शुक्र आणि गूढ परिणाम देणारा राहू यांची प्रभावी युती तीन राशींसाठी भाग्यदायी ठरणार असून या व्यक्तींचे नशीब अक्षरशः चमकू लागेल.
advertisement
राहू–शुक्र युती, कधी आणि कशी होणार?
ज्योतिषानुसार, 2026 च्या सुरुवातीला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल, तर राहू आधीच कुंभ राशीत भ्रमण करत असेल. हा संयोग 6 फेब्रुवारी 2026 ते 2 मार्च 2026 या काळात सर्वाधिक प्रभावी राहील. या कालावधीत दोन्ही ग्रह कुंभ राशीत एकत्र येऊन बलवान युती तयार करतील. राहू 5 डिसेंबर 2026 पर्यंत कुंभ राशीत राहील, त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल.
वृषभ
शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असल्यामुळे राहू–शुक्र युतीचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव वृषभ राशीच्या व्यक्तींवर दिसेल. करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदल किंवा बढती यांसारखे योग प्रबळ होतील. व्यवसायात विस्तार, नवीन करार किंवा आर्थिक गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आणि कामातील अडथळे दूर होतील. विद्यार्थ्यांना विदेश शिक्षण, शिष्यवृत्ती किंवा परीक्षांत उल्लेखनीय यश मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
राहू आणि शुक्र युती मिथुन राशीची भाग्यरेखा उंचावेल. देशांतर्गत तसेच विदेश प्रवासाचे संयोग दिसतील. दीर्घकाळ अडकलेली कामे अचानक पूर्ण होतील.
आर्थिक परिस्थतीत सुधारणा होईल, उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्याची शक्यता, नव्या जबाबदाऱ्या येण्याचा योग. कामाच्या ठिकाणी विरोधक शांत राहतील आणि प्रतिष्ठा वाढेल. वैयक्तिक आयुष्यात आनंद, शांतता आणि समृद्धी निर्माण होईल.
धनु
धनु राशीसाठीही हा काळ प्रगतीचा असेल. धैर्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी, नवी दिशा मिळू शकते. विदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठे लाभ होतील. अडचणींवर मात करून यश मिळेल. आर्थिक लाभाचे योग प्रबळ होतील.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
