तुळशी विवाह कार्तिक महिन्यातल्या सर्वात शुभ तिथींपैकी एक मानला जातो. या दिवशी तुळस आणि शाळीग्राम (भगवान विष्णूंचं स्वरूप) यांचा विवाह विधीपूर्वक केला जातो. असं मानलं जातं की, तुळशी विवाहामुळे आयुष्यात वैवाहिक सुख, संतुलन, यश आणि शांती टिकून राहते. याच दिवसापासून हिंदू धर्मातल्या सोळा संस्कारांसारख्या शुभ कार्यांची सुरुवातही होते. प्रबोधिनी एकादशीपर्यंत लग्न, गृहप्रवेश, मुंडन यांसारखी मंगल कार्यं वर्जित मानली जातात, पण तुळशी विवाहाच्या नंतर या सर्व कार्यांसाठी शुभ मुहूर्त सुरू होतात.
advertisement
तुळशी विवाह कधी आहे?
पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी 2 नोव्हेंबर 2025 ला सकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी सुरू होत आहे. या तिथीची समाप्ती 3 नोव्हेंबरला सकाळी 2 वाजून 7 मिनिटांनी होईल. उदय तिथीनुसार या वर्षी 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल.
शुभ मुहूर्त
तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी सुरू होईल. गोधूलि मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 01 मिनिटांपर्यंत राहील. तुळशी विवाहाच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 4 वाजून 50 मिनिटांपासून ते 5 वाजून 42 मिनिटांपर्यंत आहे. अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 42 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 26 मिनिटांपर्यंत वैध आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी व्याघात योग राहील. त्यानंतर सर्वार्थ सिद्धी योग संध्याकाळी 5 वाजून 3 मिनिटांपासून 3 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत राहणार आहे.
तुळशी विवाह कसा करावा? (पूजा पद्धत)
सर्वात आधी घराची चांगली साफसफाई करायला पाहिजे. पूजा करणाऱ्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, कारण पिवळा रंग सौभाग्य आणि पवित्रतेचं प्रतीक आहे.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढायला पाहिजे. एका स्वच्छ लाल कपड्याचा वापर करून विवाहासाठी मंडप तयार करा. मंडपाला फुलं, आंब्याचे आणि केळीचे पानं वापरून सजवा, जेणेकरून तो पारंपरिक विवाहासारखा दिसेल.
तुळशीचं रोप मंडपात ठेवायला पाहिजे आणि त्यांच्याजवळ भगवान कृष्णाची मूर्ती किंवा शाळीग्राम स्थापना करा. शाळीग्रामना नवीन वस्त्रं परिधान करा.
पैसा, पद-प्रतिष्ठा..! तळहातावर अशी भाग्यरेषा असणारे आयुष्यात मोठं नाव कमावतात
तुळशी मातेला लाल रंगाची ओढणी (चुनरी) अर्पण करा. त्यानंतर कृष्णाला आणि तुळशी मातेला फुलांच्या माळा घाला. आता दोघांचा विवाह संस्कार पूर्ण करण्यासाठी शक्य ते हिंदू धार्मिक विधी करावे. अक्षता म्हणताना कुटुंबातल्या सर्वांनी मिळून अक्षता-फुलांचा वर्षाव करा. भगवान विष्णू तसंच तुळशी मातेकडे सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा. शेवटी तुळस आणि कृष्ण / शाळीग्रामची आरती करा त्यांना मिठाई तसंच मोसमी फळांचा नैवेद्य दाखवा.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
