लाल धागा किंवा लाल रिबन: मनी प्लांटवर लाल रंगाचा धागा किंवा रिबन बांधणे खूप शुभ मानले जाते. लाल रंग हा ऊर्जा, यश आणि मांगल्याचे प्रतीक आहे. लाल धागा बांधल्यास मनी प्लांटची वाढ जलद होते आणि घरात धन-समृद्धीचा वेग वाढतो.
नाणं: मनी प्लांटच्या मुळाशी किंवा वेलीवर लाल धाग्याने एक नाणे बांधा. हे नाणे लक्ष्मी देवीला आकर्षित करते, असे मानले जाते. यामुळे धन-संपत्ती टिकून राहते आणि कर्जातून मुक्ती मिळते.
advertisement
हिरवा धागा: बुध ग्रहाचे प्रतीक असलेला हिरवा धागा मनी प्लांटवर बांधल्यास घरात बुद्धी आणि समृद्धीचा समन्वय साधला जातो. यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळते.
इतर महत्त्वाचे वास्तु नियम:
दिशा: मनी प्लांट नेहमी आग्नेय कोपऱ्यात म्हणजे अग्नी दिशेला लावावा. हे स्थान गणेशाचे आणि समृद्धीचे मानले जाते.
वेलीची दिशा: मनी प्लांटच्या वेली वरच्या दिशेने वाढल्या पाहिजेत. वेली जमिनीवर पसरल्यास आर्थिक नुकसान होते.
शुक्रवारचा दिवस: मनी प्लांटवर या वस्तू बांधण्यासाठी शुक्रवारचा दिवस जो लक्ष्मी देवीला समर्पित आहे अत्यंत शुभ मानला जातो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
