TRENDING:

'मी ऑपरेशन मौतजवळ आलोय', GFला VIDEO कॉल करत तरुणाने लॉजमध्ये संपवलं

Last Updated:

Jalgaon News: "मी ऑपरेशन 'मौत'जवळ पोहचलोय..." अशा शब्दांत आपल्या प्रेयसीशी शेवटचा व्हिडीओ कॉल करत एका युवकाने आयुष्याचा शेवट केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: "मी ऑपरेशन 'मौत'जवळ पोहचलोय..." अशा शब्दांत आपल्या प्रेयसीशी शेवटचा व्हिडीओ कॉल करत एका युवकाने अमळनेरमधील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. सौरभ शर्मा (वय अंदाजे ३०) असं मयत तरुणाचं नाव असून त्याने लॉजमध्ये आयुष्याचा शेवट केला आहे. तो मागील काही दिवसांपासून अमळनेरमधील लॉजमध्ये बनावट नावाने खोली घेऊन राहत होते. इथेच त्याने आत्महत्या केली. त्याच्यावर गुजरातमधील अहमदाबादमध्ये पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

सौरभ शर्मा गेल्या पाच-सहा दिवसांपासून अमळनेर बसस्थानकाजवळील पाठक प्लाझामधील एका लॉजमध्ये 'करणसिंग एम. पी.' या बनावट नावाने राहात होता. तो दररोज सकाळी अकराच्या सुमारास उठवायला सांगायचा. मात्र १२ तारखेला त्याने लॉज व्यवस्थापकाला सांगितले होते की, "माझी झोप डिस्टर्ब करू नका, मला उशिरा उठवा." १३ मे रोजी दुपारी लॉज कर्मचारी त्याला उठवण्यासाठी गेले असता आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सायंकाळी पुन्हा प्रयत्न केल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत डोकावले असता, सौरभने बेडशीट फाडून छताच्या कडीला गळफास घेतलेला दिसून आला.

advertisement

तत्काळ त्याला खाली उतरवण्यात आले. तपासात त्याची खरी ओळख उघड झाली. अहमदाबादचा रहिवासी असलेला सौरभ शर्मा पोस्को कायद्यानुसार आरोपी असल्याचे कळते. मृत्यूपूर्वी त्याने आपल्या प्रेयसीशी व्हिडिओ कॉल करून “मी ऑपरेशन ‘मौत’ जवळ पोहचलोय...” असे सांगत भावनिक निरोप दिला अशी देखील माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्याच्या रुममध्ये आढळलेल्या डायरीत काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असून, त्याने त्याला फसवणाऱ्या मुलीच्या आणि तिच्या कुटुंबीयांविषयी भावना व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

अमळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला मोबाईल, डायरी आणि इतर साहित्य फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान हातरून गुजरातमधून अमळनेर येथे का आला?, व त्याने अमळनेर येथेच का आत्महत्या केली?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'मी ऑपरेशन मौतजवळ आलोय', GFला VIDEO कॉल करत तरुणाने लॉजमध्ये संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल