नेमकं प्रकरण काय?
यावल तालुक्यातील मोहराळा गावातील रहिवाशी असलेला साहिल शब्बीर तळवी (वय १९) हा तरुण १६ जून पासून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही त्याचा कुठेच थांगपत्ता लाला नाही. यामुळे कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाण्यात मुलगा हरवण्याची तक्रार दिली होती. या दरम्यान २० जून रोजी त्याचा मृतदेह हो मोहराळा गावाकडून वड्री गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेवा मधुकर चौधरी यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला होता.
advertisement
मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर मयत साहिलच्या कुटुंबीयांनी आणि नातलगांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. या संशयातून त्यांनी गावातील निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी याच्या घरावर हल्ला चढवला. त्याच्या वाहनाची तोडफोड केली. घटनेच्या माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पोलीस पथकासह गावात दाखल झाले होते. त्यांनी गावात शांतता प्रस्थापित करून चोख बंदोबस्त लावला. तसेच मृतदेह तेथून काढून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन साठी पाठवला.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी गावातील दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी बोलावले. त्यांची कसून चौकशी केली. यावेळी अल्पवयीन मुलांनी हत्येची कबुली दिली. निलंबित पोलीस कर्मचारी अय्युब हसन तडवी याच्या सांगण्यावरून साहिल तडवी याला गांजाचं सेवन करायला लावलं, यानंतर विहिरीत ढकलून दिलं. तसेच त्याचा मोबाईल एका विहिरीत टाकून दिला, अशी माहिती अल्पवयीन मुलांनी दिली. घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर यावल पोलिसांनी समीर गफुर तडवी यांच्या फिर्यादीवरून अयुब तडवीसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यावल पोलीस पुढील तपास करत आहेत.
