सत्तू कोळी (रा. शिव कॉलनी) हा नूतन मराठा महाविद्यालयात एफवायबीएचे शिक्षण घेत होता आणि एका हॉटेलमध्ये काम करत होता. गेल्या वर्षभरापासून शिव कॉलनीतील एका कुटुंबाने त्याचा सांभाळ केला होता. मात्र, प्रेमभंगानंतर गेल्या काही दिवसांपासून सत्तू नैराश्यात गेला होता. अखेर शनिवारी मध्यरात्री संरक्षक भिंतीवरून महाविद्यालयात प्रवेश करून पार्किंगमधील झाडाला दोरीने गळफास लावून त्याने आपले आयुष्य संपवले. सत्तू कोळी याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मित्रांसह शिव कॉलनीतील सांभाळ करणाऱ्या कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली होती.
advertisement
मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर शेवटचा संदेश
सत्तूने आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टाग्रामवर तीन फोटो आणि एक व्हिडिओ स्टोरी स्वरूपात शेअर केली होती. 1 मिनिट 53 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. 'माझ्यासाठी रडू नका. मी राहील तुमच्यासोबत. मनात ठेवा मला. माझ्याकडून चुका झाल्या असतील तर मला माफ कराल, सॉरी, मी खूप चुकीचा होतो. मला जाणवत होते म्हणून दोन महिन्यांपासून दूर राहिलो, बाय...' असे तो आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत म्हणाला आहे. 'सांगून द्या मेलो तर अंत्यसंस्काराला येशील.... सत्तू कोळी याने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. मिस यू भावांनो, असे लिहून एक मित्रांसोबत केलेला कॉमेडी व्हिडिओ स्टोरीला ठेवला होता.
सत्तू कोळीच्या दोन मिनिटाच्या व्हिडीओत काय?
यानंतर 1 मिनिट 53 सेकंदांचा त्याने त्याचे दुःख व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला.'मी रडलो नाही. तुम्ही पण रडू नका. खास करून तिला सांगून द्याल. मी मेलो तर अंत्यसंस्काराला येशील. ती येत नाही तोपर्यंत माझा मृतदेह उतरवू नका, हा माझा मित्रांसाठी मेसेज आहे. मी वरून तुम्हा सगळ्यांना बघेल. मी खचलो नाही, तुटलो पण नाही. पण मला आतून तोडले गेले. माझे मन लागत नाही. मी जातोय असं त्याने म्हटले. व्हिडीओत सत्तूने म्हटले की, खाली राहून पण मी काय करू, तिची काळजी घ्या. तू माझी झाली नाही, पण तुझं नाव माझ्या हातावर आहे. माझ्या हातातील कडे गौरवला घालून देत हे बघून तू खुश राहशील. मी रडलो नाही. तू पण रडू नको असंही त्याने म्हटले.
पहाटे तीन वाजता शेवटचा व्हिडिओ अपलोड
शनिवारी रात्री सुमारे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान, रेल्वेतून प्रवास करत असताना सत्तूने हा व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पार्किंगमध्ये झाडाला लटकलेला आढळून आला. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
