पेशाने वकील असलेल्या महिलेला दहा ते बारा जणांच्या टोळीने रिंगण करून अमानुष मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित महिला वकील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचं संपूर्ण अंग काळंनिळं झालं आहे. याबाबतचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण गावचे सरपंच आणि त्यांच्या साथीदारांकडून करण्यात आल्याचा दावा पीडित महिलेनं केला आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील सनगाव येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेला शेतामध्ये रिंगण करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या महिलेला अमानुष मारहाण केलेले फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहेत. यामुळे संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे. गावातील सरपंच आणि इतर व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान असं मारहाण झालेल्या पीडित महिलेचे नाव आहे. त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीलीचा व्यवसाय करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील ध्वनिप्रदूषणाची तक्रार का केली? म्हणून अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. पीडितेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. याबाबत तक्रारी दिल्याच्या रागातून ही मारहाण झाली आहे. संतोष देशमुख प्रकरण ताजं असताना बीडमध्ये एका वकील महिलेला अशाप्रकारे मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
