TRENDING:

बीडमध्ये पैशांसाठी मुकादमाचा मजूर महिलेवर अत्याचार, गावात अश्लील फोटो केले व्हायरल

Last Updated:

Crime in Beed: बीडमध्ये एका मुकादमाने मजूर महिलेवर विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं पीडित महिलेवर अत्याचार करून तिचे फोटो गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांसाठी बीड सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीडमधील गुन्हेगारी विश्व संपूर्ण देशासमोर आलं. देशमुख हत्या प्रकरण ताजं असताना आता बीडमध्ये एका मुकादमाने मजूर महिलेवर विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं पीडित महिलेवर अत्याचार करून तिचे फोटो गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे घडली आहे. ऊसतोडणीसाठी घेतलेल्या उचल रकमेतील बाकी देत नाही, म्हणून एका मुकादमाने एका विवाहित मजूर महिलेवर अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अत्याचार करतानाचे पीडित विवाहितेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो शूट केले आणि हे फोटो गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले.

advertisement

गावात बदनामी झाल्याच्या कारणातून पीडित महिलेनं विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आता दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल शिंगारे असं आरोपी मुकादमाचं नाव आहे. शिंगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्याहून मतदानाला आलो, पण मतदान केंद्रावर.., जालन्याच्या आनंद सोबत अजब घडलं?
सर्व पहा

या धक्कादायक प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीच्या अटकेसाठी पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पैशांसाठी एका उसतोड मजूर विवाहित महिलेवर अशाप्रकारे मुकादमाने अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
बीडमध्ये पैशांसाठी मुकादमाचा मजूर महिलेवर अत्याचार, गावात अश्लील फोटो केले व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल