हा प्रकार ताजा असताना आता संतोष देशमुखांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुखांना मारण्यासाठी वाल्मीक कराड गँगने चार खास हत्यारं बनवली होती. याबाबतचा 'वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट' News 18 लोकमतच्या हाती लागला आहे. ज्यात संतोष आण्णांना मारण्यासाठी वापरलेल्या हत्यारांचा तपशील देण्यात आला आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यावेळी मारेकऱ्यांनी चार वेगवेगळ्या हत्यारांनी देशमुख यांना मारहाण केली. कराड गँगने देशमुखांना मारण्यासाठी ही चार खास हत्यारं बनवली होती. यात १) गॅस पाईप, २) गाडीच्या क्लच वायरचा वापर करून बनवलेला धातूचा चाबूक, ३) लाकडी बांबूची काठी आणि ४) लोखंडी पाईप अशा हत्यारांचा समावेश आहे. ही माहिती 'वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट'मध्ये देण्यात आली आहे.
advertisement
या हत्यारांनी केलेल्या मारहाणीत संतोष आण्णांच्या अंगावर तब्बल 150 जखमा आढळून आल्या होत्या. तपास यंत्रणेने कल्पनाचित्र रेखाटून आरोप पत्रात हे सादर केले आहे. आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींना देखील याच हत्याराने मारहाण केल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिवाय तीन डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालात या हत्यारांनी मारहाण झाल्यास मृत्यू होऊ शकतो असे नमूद केले आहे. याचंच गांभीर्य दर्शविणारा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट समोर आला आहे.
