वसंत खेडकर असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे. तर दिक्षा कोरडे असं मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. महिलेला मारहाण होताना तिची लेकरं सुद्धा त्या आरोपी नराधमांला रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण आरोपी पीडितेच्या १३ वर्षीय मुलीला देखील चापट मारली आहे.
advertisement
नेमका हा संपूर्ण प्रकार कसा घडला, याबाबत पीडित महिलेने आपबिती सांगितली आहे. मारहाणीवर प्रतिक्रिया देताना पीडित महिलेनं सांगितलं की, मी साडे सात वाजता ड्युटीवरून घरी आले होते. यानंतर ५-१० मिनिटांत मुलगा घरी आला आणि शेजारचे काका ओरडत आहेत, असं सांगितलं. ते का ओरडत आहेत, हे विचारायला मी गेले. यावेळी खेडकर म्हणाला की, पोरांना रस्त्यावर खेळायला सोडतीस का? तुझ्या पोरांच्या अंगावरून गाडी घालू का? मग मी घाला बरं असं म्हटलं. यानंतर खेडकरने अश्लील शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. तू तर लय माजलीय, असं म्हणत अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केली. त्याने मला केसात हात घालून अवघड जागेवर लाथा बुक्क्याने मारलं.
या मारहाणीनंतर तो धारदार वस्तू घेऊन आला होता. मात्र भांडणात माझी नणंद मध्ये आली, यामुळे आरोपी मागे फिरला. नाहीतर त्याने आम्हाला सगळ्यांना मारून टाकलं असतं. आरोपीने आणि त्याच्या बायकोने मला त्यांच्या घरात ओढत नेत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.
