गोविंदाचे अत्यंत जवळचे मित्र ललित बिंदल यांनी गोविंदाची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली आहे. गोविंदाला रात्री घरी असताना चक्कर आली. त्यानंतर त्याला जुहूतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाला सुरुवातीला डॉक्टरांनी घरीच फोनवरून काही सुचना दिल्या. फोनवरून सल्लामसलत करून त्याला प्रथमोपचार देम्यात आले. मात्र काही फरक न पडल्याने आणि प्रकृती आणखी बिघडल्याने रात्री 1 वाजताच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल होण्याच्या एक दिवस आधी अभिनेते धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेला होता. त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात जात असताना स्पॉट करण्यात आलं. त्याचा हॉस्पिटल बाहेरील कारमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेला काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदाच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू आहेत. त्याचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचं बोललं जात आहे. मला पुरावे मिळाल्याशिवाय मी काही बोलणार नाही असं सुनिताने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. सुनिता अहुजा अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाची अनेक सीक्रेट बाहेर काढताना दिसतेय. सुनिताने डिवोर्स फाइल केला होता असंही सांगितलं जातं आहे.
दरम्यान एक वर्षांआधी देखील गोविंदा रुग्णालयात दाखल झाला होता. पहाटे घरात तयारी करत असताना त्याच्या परवानाधारक रिवॉल्वरमधून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली होती. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. तो काही दिवस रुग्णालयात दाखल होता. त्याच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना चिंता लागून होती. त्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर गोविंदा पुन्हा त्याची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल झाला आहे.
