टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी ती आणि अभिनेता कुणाल वर्मा अपहरण आणि फसवणूक प्रकरणामुळे ती चर्चेत होती. आता तिची एक Oops Moment जोरदार व्हायरल होत आहे. खरंतर आधी सगळ्यांनाच तिची Oops Moment वाटली होती मात्र तिने हे मुद्दाम केल्याचं दिसतंय.
advertisement
पूजा अलीकडेच मुंबईत स्पॉट झाली. स्टुडिओमधून बाहेर पडताच पापाराझींनी तिला घेरलं. त्यावेळीने असं काही केलं की आता ते सोशल मीडियावर गॉसिपचा विषय ठरला आहे. पूजाने या दिवशी पिवळ्या रंगाचा स्ट्रॅपी बॉडीकॉन ड्रेस वेअर केला होता. यासोबत तिने व्हाइट ब्राऊन हाय हिल्सही घातल्या होत्या. केस मोकळे ठेवून पूजा मोबाईलवर बोलत आरामात चालत होती. पण मागे वळताच ती कॅमेऱ्यात जरा वेगळ्याच अवतारात कैद झाली.
पूजाचा इनरवेअर मागून स्पष्ट दिसत होते. पूजालाही याची कल्पना होती पण तिने याबद्दल अजिबात संकोच केला नाही. उलट नेहमीसारखीच ती पापाराझींना पोझ देत राहिली. हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेक युझर्सनी पूजाला ट्रोल केलं.एक युझर म्हणाला, "इनरवेअर दिसत आहेत हे ठीक आहे पण अशा पद्धतीने शो ऑफ करणं योग्य नाही." दुसऱ्या युझरने लिहिलंय, "असं घालण्यात काही अर्थ नाही. कूप चीप दिसतेय. कदाचित जाणूनबुजून केलं आहे."
