या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकावर मेकर्स खूप खर्च करतात. त्यांचं खाणं-पिणं ते त्यांची औषधे अशा सर्व गरजेच्या वस्तू स्पर्धकांना पुरवल्या जातात. हे सर्व स्पर्धक २४ तास घरातील कॅमेरांच्या निगराणीखाली असतात. अशातच स्पर्धक काय बोलत आहेत, हे सर्वांना ऐकू यावे यासाठी त्यांना गळ्यात माइक घालावा लागतो. केवळ झोपताना आणि वॉशरूमच्या आत असताना त्यांना हा माइक काढण्याची परवानगी असते. इतर वेळी एखाद्याच्या गळ्यात हा माइक नसेल, तेव्हा बिग बॉस स्वतः संबंधित स्पर्धकाला माइक घालायला सांगतात. मात्र या एका माइकची किंमत किती असेल, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? स्वतः सलमानने या माइकची किंमत सांगितली आहे.
advertisement
स्पर्धकांच्या फीपेक्षाही माइक महाग
बिग बॉसचे स्पर्धक गळ्यात घालतात त्या एका माइकची किंमत ही काही स्पर्धकांच्या महिनाभराच्या फीपेक्षाही जास्त आहे. गेल्या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानने एका टास्क दरम्यान या माइक्सची किंमत सांगितली. स्पर्धकांना टास्क देण्यात आला होता की अशा २ स्पर्धकांची जोडीची निवड करा, जी घरात फक्त भांडणं करते आणि घरातल्या इतर स्पर्धकांना त्यांचं नातं पसंत नाही. यावेळी बहुतांश स्पर्धकांनी तान्या आणि फरहाना या जोडीचं नाव घेतलं.
या टास्कमध्ये दोघींना वेगवेगळ्या खुर्च्यांवर बसवलं गेलं आणि त्यांच्यावर पंख, सुकलेली पानं, पावडर असा काही कचरा टाकण्यात आला. या टास्कदरम्यान माइक खराब होऊ नये म्हणून तो त्यांना काढायला सांगण्यात आलं. तेव्हा सलमानने त्यांना सांगितलं की माइक सांभाळून ठेवा, कारण त्याची किंमत ४.५ लाख इतकी आहे.
घरात असे काही स्पर्धक आहेत, ज्यांना प्रत्येक आठवड्याला १-२ लाख इतके मानधन दिले जाते. अशा परिस्थितीत या माइकची किंमत या स्पर्धकांच्या मानधनापेक्षाही जास्त असल्याचे समजते.
या आठवड्यात होणार मिड वीक एविक्शन
गेल्या वीकेंड का वारमध्ये डबल एविक्शन झाले. यावेळी नीलम गीरीला ऑडियन्सच्या वोट्समुळे, तर अभिषेक बजाजला प्रणित मोरेच्या निर्णयामुळे घराबाहेर जावे लागले. अभिषेक बजाजचे एविक्शन चाहत्यांना अजिबात पटलेले नाही. दरम्यान, या आठवड्यात मिड वीक एविक्शन होणार असून सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृदूल तिवारी घराबाहेर होणार आहे.
