काही महिन्यांआधी प्राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' हे नाटक पाहून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर भारावून गेले. त्यांनी हे नाटक पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत नाटकाचं, नाटकातील कलाकारांचं, मराठी नाट्यसृष्टीचं कौतुक केलं. अनुपम खेर यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह या देखील मराठी नाटक पाहण्यासाठी गेल्या होत्या. मराठी नाटक पाहिल्यानंतर त्यादेखील भारावल्या. प्रतिक्रिया देत त्यांनी नाटकाचं कौतुक करत, 'जाताना दोन-तीन रुमाल घेऊन जा, खूप रडायला येतं' असंही सांगितलं. अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी कोणतं मराठी नाटक पाहिलं जे त्यांना रडवून गेलं.
advertisement
( सगळीकडे नुसती आर्ची आर्ची, पण कुठेय तिचा परश्या? काय करतो आकाश ठोसर! )
बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांचं मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीवरच प्रेम कधीच लपून राहिलं नाही. त्या उत्तम मराठी बोलतात, अनेक मराठी नाटकांना त्या आवर्जून हजेरी लावतात. मराठी सिनेमा पाहणं त्यांना आवडलं. त्यांनी नुकतीच एका मराठी नाटकाला हजेरी लावली होती. हे नाटक त्यांना प्रचंड आवडलं. नाटक पाहिल्यानंतर त्यांनी नाटकातील सगळ्या कलाकारांचं कौतुक केलं.
रत्ना पाठक शाह या 'असेन मी नसेल मी' हे मराठी नाटक पाहायला गेल्या होत्या. नाटक पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या, ठदोन - चार दिवसांआधी मी एक सुंदर मराठी नाटक पाहिलं, संदेश कुलकर्णी लिखित, अमृता सुभाष दिग्दर्शिक असेन मी नसेन मी. मला खूप आवडलं. अप्रतिम परफॉर्मन्सेस, सुंदर लेखन आणि एक विषयवस्तू जी आपल्या सगळ्यांना आपल्या कुटुंबात दिसतेय."
"हे नाटक मनाला स्पर्शून गेलं. कारण डिमेन्शिया, अल्झायमर, एजिंग हे सगळं आपल्या कुटुंबाचा हिस्सा झाला आहे. आपण याकडे कानाडोळा करतो, कधीकधी दुसऱ्यांना सांगणं टाळतो. पण हे सत्य आपल्या आयुष्याचं सत्य आहे. माझ्यासाठी तर कदाचित माझ्या भविष्याचं सत्य आहे. पण कंडिशनला, या परिस्थितीला समजून घेणं गरजेचं आहे आणि हे नाटक हे काम करतंय."
रत्ना पाठक शेवटी म्हणाला, "सुंदर परफॉर्मन्सेस नीना, राणी सुंदर... सुंदर... आणि अर्थात राणी ( शुभांगी गोखले ) नक्की बघा. विचार करायला भाग पाडेल. जाताना 2-4 रुमाल सोबत घेऊन जा, खूप रडायला येतं".
असेन मी नसेन मी या नाटकांना अभिनेत्री नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाने आतापर्यंत 22 पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे 8 पारितोषिके, अखिल भारतीय नाट्य परिषद 4 पारितोषिके, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सारख्या पुरस्कारांचा यात समावेश आहे.
