बॉलिवूडच्या या अभिनेत्याचं नाव शाहरुख खान आहे. बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणून तो ओळखला जातो. त्याच्या आतापर्यंतच्या करियर मध्ये त्याला नुकताच पहिला 'नॅशनल अवॉर्ड' मिळाला. हा अवॉर्ड मिळाल्यावर त्याचा जवळचा मित्र ज्याने त्याच्या वाईट काळात साथ दिली होती, तो मित्र म्हणजेच निर्माता आणि अभिनेता विवेक वासवानी यानेही किंग खानला शुभेच्छा दिल्या होत्या.
advertisement
धडकी भरवणारी नजर, खतरनाक सस्पेन्स; शाहरुखच्या वाढदिवशी KING चा फर्स्ट लूक आऊट
काय म्हणालेला शाहरुखचा खास मित्र?
किंग खानने प्रचंड मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे. मुलाखतीत निर्माता विवेक म्हणालेला, "शाहरुख मुंबईत आला तेव्हा त्याचा खूप वाईट काळ होता. तो ज्याच्या घरात राहायचा त्याचेच कपडे घालायचा. दोन दोन दिवस त्याला अन्न मिळायचे नाही. आम्ही जेव्हा एकत्र जेवायला बसलो तेव्हा त्याने आपल्या आईच्या आजारपणाबद्दल आणि बहीण गौरीच्या लग्नाबद्दल सांगितले होते. त्याने आपले मन माझ्याजवळ हलके केले होते."
विवेक पुढे म्हणाला, "ख्रिसमसच्या काळात एका पार्टी मधून येताना शाहरुखची तब्बेत बिघडली होती. पुढे तो दिल्लीत गेल्यावर त्याच्या आईची तब्बेत खूपच खालावली. औषधे पाठवली होती. मी दिल्लीला गेलो. त्यांना सगळ्यांना भेटलो. पण त्याची आई वाचली नाही. त्यांचे काही दिवसातच निधन झाले. त्यानंतर शाहरुखने एक ठरवले की मला अभिनयातच करियर करायचे आहे. तो डायरेक्ट माझ्या घरी आला आणि त्याचा सिनेसृष्टीचा प्रवास सुरु झाला.
शाहरुखचं नेटवर्थ किती?
शाहरुखने 'राजू बन गया जेंटलमैन' या प्रोजेक्टवर काम सुरु केले. 1992 मध्ये आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्या सिनेमाने सिनेसृष्टीला शाहरुखच्या रुपाने एक नवा चेहरा दिला. आज शाहरुख हा बॉलिवूडचा सगळ्यात श्रीमंत अभिनेता आहे. त्याचे नेटवर्थ 12,490 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त आहे. जे तुलनेत इतर बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे.
