बॉक्स ऑफिसवर झाले वेगवेगळे रिलीज
यश जौहर यांनी 1990 मध्ये 'अग्निपथ' बनवला आणि त्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. यश जौहर यांचा हा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट होता, पण चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही. त्यामुळे ते खूप निराश झाले.
दुसरीकडे, 2012 मध्ये यश जौहरचा मुलगा करण जौहरने 'अग्निपथ'चा रीमेक बनवला. त्यांनी मूळ चित्रपटाची कथा किंवा पात्रांमध्ये कोणताही बदल केला नाही आणि बॉक्स ऑफिसवर हा रीमेक ऐतिहासिक ठरला. 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'अग्निपथ' वर करण जौहरने 58 कोटींचा खर्च केला, तर चित्रपटाने 193 कोटींची कमाई केली. संजय दत्तने खलनायक कांचा चीना यांच्या भूमिकेत धमाल केली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
advertisement
यश जौहर यांच्या चित्रपटांची खासियत
यश जौहर यांना सुरुवातीला फोटोग्राफीमध्ये रस होता, पण नंतर त्यांनी देवानंद साहेबांच्या नवकेतन सिनेमा प्रॉडक्शन हाऊस मध्ये काम सुरू केले. नंतर त्यांनी धर्मा प्रॉडक्शन्स स्थापन केले. या बॅनरअंतर्गत त्यांनी 'दोस्ताना', 'कुछ कुछ होता है', 'अग्निपथ', 'गुमराह' आणि 'कभी खुशी कभी गम' सारखी यशस्वी चित्रपटं निर्माण केली. यश जौहर यांच्या चित्रपटांची खासियत होती भारतीय संस्कृतीची झलक दाखवणं.
यश जौहर यांनी 1990 मध्ये 'अग्निपथ' तयार केला. मुकुल एस. आनंद यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यांनी विजय दीनानाथ चौहान या भूमिकेत दाखवले, जो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये जातो. चित्रपटात नीलम कोठारी, डॅनी डेंग्झोंगपा आणि अर्चना पूरनसिंह यांसारखे स्टार होते, तरीही चित्रपट फ्लॉप ठरला. या गोष्टीचा यश जौहर यांना प्रचंड राग आला होता.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करण जौहरने बनवला 'अग्निपथ'
करण जौहरने आपल्या 'An Unsuitable Boy' मध्ये सांगितले आहे की, जेव्हा 'अग्निपथ' बनत होता, तेव्हा यश जौहर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पूर्णपणे खात्री होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल. पण, प्रत्यक्षात चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि यश जौहरचे मन दुखावले. यानंतर 22 वर्षांनी, करण जौहर यांनी आपल्या वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'अग्निपथ'चा रीमेक बनवला. ऋतिक रोशन आणि प्रियंका चोप्रा स्टारर 'अग्निपथ' सुपरहिट ठरला. चित्रपटाचं बजेट 58 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने भारतात 120 कोटी तर जगभरात 193 कोटींची कमाई झाली.
