ब्रीच कँडी रुग्णालयाने PTI शी बोलताना सांगितलं की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारांसाठी घरी नेण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी म्हणजेच 12 नोव्हेंबरला सकाळी जवळपास 6:30 वाजताच्या सुमारास त्यांना ब्रीच कँड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ब्रीच कँडी रुग्णालया बाहरेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. धर्मेंद्र यांनी स्पेशल अँम्बुलन्सने घरी नेण्यात आलं आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातून धर्मेंद्र यांना घेऊन जाणारी अँम्बुलन्स बाहेर पडताना दिसत आहे. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं वृत्त समोर येताच चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीबाबत सगळेच चिंता व्यक्त करत होते.
दरम्यान धर्मेंद्र यांच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवण्यात आली होती. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या मृत्यूची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली. धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत आहे, डॉक्टरांच्या उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं. खोट्या अफवा पसरवू नका असं आवाहनही त्यांनी केलं.
ईशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "मीडिया अफवांचा वेगाने प्रसार करत आहे. माझे वडील ठीक आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. आमच्या कुटुंबाला कृपया थोडी प्रायव्हसी द्या ही नम्र विनंती. पप्पा लवकर बरे व्हावे यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार."
