रुग्णालयातील सूत्रांनुसार, त्यांना आता घरी विश्रांती घेण्याचा आणि डेली हेल्थ चेकअप करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुटुंबातील सदस्य हेमा मालिनी, ईशा देओल, सनी देओल आणि बॉबी देओल हे सतत रुग्णालयात त्यांची काळजी घेण्यासाठी उपस्थित होते.
advertisement
धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धर्मेंद्र रुग्णालयात असल्यापासूनच त्यांच्या प्रकृती ठीक व्हावी, ते लवकर बरे व्हावेत यासाठी सगळे प्रार्थना करत होते. अखेर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या एका चाहत्याचा इमोशनल करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक चाहता त्यांच्या मुंबईतील घराबाहेर रडताना दिसत आहे. धर्मेंद्र लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. या चाहत्याच्या हातात एक फलक आहे. त्यावर धर्मेंद्र यांचा फोटो आहे. त्यावर त्याने लिहिलंय, 'धर्मेंद्रजी लवकर बरे व्हा'.
या चाहत्याचं धर्मेंद्रवर खूप प्रेम आहे. धर्मेंद्र यांच्या सिनेमाची सगळी गाणी त्याला पाठ आहेत. त्याने इमोशनल होत दोन गाणी गाऊनही दाखवली. त्या फॅनला पापाराझींनी सांगितलं, धर्मेद्र आता घरी आलेत. त्यावर तो म्हणाला, हा माहिती आहे. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. मी त्यांचा बालपणापासूनचा फॅन आहे. त्यांच्या फिल्म बघत लहानाचे मोठे झालो
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर, सनी देओलच्या टीमने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. निवेदनात म्हटले आहे की, "धर्मेंद्र यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते घरीच त्यांचे उपचार सुरू ठेवतील. आम्ही मीडिया आणि जनतेला विनंती करतो की त्यांनी कोणत्याही अटकळी टाळाव्यात आणि यावेळी कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा. आम्ही सर्वांच्या प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. कृपया धर्मेंद्रजींच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत रहा. कृपया त्यांचा आदर करा, कारण ते तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करत होते."
