अभिनेते धर्मेंद्र यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आयसीयू वॉर्डमधील तो व्हिडीओ होता जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी हा व्हिडीओ शूट करणाऱ्याला शोधून काढलं. हा व्हिडीओ ब्रीच कँडी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काढला होता. गोपनीयतेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे असं म्हटलं जात आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. कर्मचाऱ्याने ICU मधून धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लाखो लोकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.
advertisement
89 वर्षांचे अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. 12 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्यापासून देओल कुटुंबाकडून वारंवार त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा असं सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही देखील धर्मेंद्र यांचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ लीक झाला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात तो पापाराझींवर प्रचंड भडकला होता.
