घरीच बनवला 'मिनी ICU'
धर्मेंद्र यांना आज सकाळी अॅम्ब्युलन्सद्वारे कडक सुरक्षा व्यवस्थेत घरी नेण्यात आले. आता त्यांना घरी पूर्ण आराम करण्याची आणि नियमित आरोग्य तपासणी करण्याची सक्तीची सूचना डॉक्टरांनी दिली आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबातील सदस्य पत्नी हेमा मालिनी, मुले सनी देओल, बॉबी देओल, आणि ईशा देओल यांनी रुग्णालयात सतत उपस्थित राहून त्यांना आधार दिला.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या मुंबईतील घरी डॉक्टरांचे एक पथक पोहोचले आहे. त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांनी घरीच मिनी ICU तयार केला असून, त्यांची सतत तपासणी केली जात आहे.
अमिताभ बच्चन धावले भेटीला
धर्मेंद्र घरी परतल्याची बातमी मिळताच, त्यांचे जुने मित्र आणि सहकलाकार अमिताभ बच्चन यांनी लगेच त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी धाव घेतली. 'शोले'सह अनेक चित्रपटांत एकत्र काम केलेल्या या दोन दिग्गजांमध्ये खूप घट्ट मैत्री आहे. अमिताभ बच्चन यांनी ही मैत्री निभावत धर्मेंद्र यांची भेट घेतली.
दरम्यान, धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अमिताभ स्वतः कार चालवत त्यांच्या घरी दाखल झाले. यावेळी अमिताभ त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवताना दिसले. ८३ वर्षीय अमिताभ बच्चन ज्या सहजतेने आणि फुर्तीने गाडी चालवत धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचले, ते पाहून सर्वच चकित झाले आहेत. अशातच, धर्मेंद्र रुग्णालयात असताना त्यांना भेटण्यासाठी सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, गोविंदा आणि अमीषा पटेल यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी रुग्णालयात हजेरी लावली होती.
