TRENDING:

'एकदा पाहावं करून' म्हणत दोन पुरूष येतायत भेटायला, नक्की काय सांगणार? 6 डिसेंबरला कळणार

Last Updated:

'एकदा पहावं करून' असं म्हणत दोन पुरूष प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे दोघे नक्की काय सांगणार? याचं उत्तर प्रेक्षकांना 6 डिसेंबरला मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मराठी मनोरंजन विश्वात अनेक मराठी सिनेमे येत्या काही आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक सिनेमांचे ट्रेलर, टीझर देखील रिलीज झाले आहेत. दरम्यान एक पोस्टर समोर आलं आहे. ज्यात मराठीतील दिग्गद कलाकार दिसत आहेत. 'एकदा पहावं करून' असं ते म्हणत आहेत. ते नक्की कशाबद्दल बोलत आहेत अशा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तर या प्रश्नाचं उत्तर 6 डिसेंबरला कळणार आहे.
News18
News18
advertisement

'एकदा पाहावं करून' हे नवकोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. या नाटकात दोन पुरुषांची कथा पाहायला मिळणार आहे. हे दोन पुरूष विरुद्ध स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत. ते काही कारणास्तव समोरासमोर येतात. त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज आणि हास्याचा धडाकाय.

advertisement

या नाटकाचं खास वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास अभिनय क्षेत्रातील अनुभवी तसेच तरुण कलाकार या नाटकात आहेत. अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे व वैभव मांगले अशा दमदार कलाकार या नाटकात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातलं असं मंदिर, बाल हनुमानाचं वर्षातून अडीच दिवस दर्शन, Video
सर्व पहा

नाटकातील गंमतीजंमती, घरगुती प्रसंग आणि प्रत्येक पात्रामागची वेगळी भावनात्मक बाजू प्रेक्षकांना हसवत लोटपोट अनुभव देईल. रत्नाकर मतकरींच्या लेखनाची सहजसुंदर शैली आणि विजय केंकरे यांचं दिग्दर्शन या नाटकात आहे. भूमिका, प्रवेश क्रिएशन्स, असंम्य थिएटर्स यांनी निर्मिती आहे तर या नाटकाचं दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केलं आहे. तसेच निर्माते श्रीकांत तटकरे, मंगल केंकरे व अजय विचारे आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग 6 डिसेंबर रोजी पुण्यातील भरत नाट्य रंगमंदिर येथे होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'एकदा पाहावं करून' म्हणत दोन पुरूष येतायत भेटायला, नक्की काय सांगणार? 6 डिसेंबरला कळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल