लग्न काही 'वॉशिंग मशीन' नाही!
शोमध्ये 'धिस ऑर दॅट' या सेगमेंटदरम्यान ट्विंकल खन्नाने अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न विचारला की, "लग्नाला 'एक्सपायरी डेट' आणि रिन्यूअलचा पर्याय असावा का?" या प्रश्नावर विकी, क्रिती आणि ट्विंकलने नाही म्हणत विरोध केला, पण काजोलने मात्र होय म्हणत ग्रीन झोनमध्ये आपली जागा घेतली.
advertisement
यावेळी ट्विंकलने काजोलची फिरकी घेतली. "लग्न आहे, वॉशिंग मशीन नाही!" असा टोला ट्विंकलने मारला, पण काजोल आपल्या मतावर ठाम राहिली. याबद्दलचे कारण सांगताना काजोल म्हणाली, "मला नक्कीच वाटते की असा पर्याय असावा. तुम्ही योग्य वेळी योग्य व्यक्तीशी लग्न कराल याची काय गॅरंटी? रिन्यूअलचा पर्याय असेल तर बरे होईल आणि एक्सपायरी डेट असेल, तर कोणालाही जास्त काळ त्रास सहन करावा लागणार नाही!"
पैसे आणि आनंद यावरही चर्चा
दरम्यान, यावेळी त्यांच्यामध्ये 'पैशाने आनंद विकत घेता येतो' या विधानावरही जोरदार चर्चा झाली. ट्विंकल आणि विकीने या मताशी सहमती दर्शवली. काजोलने मात्र यावर असहमती दर्शवली. "तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी, ते कधीकधी आनंदाच्या मार्गात अडथळा आणू शकतात. ते तुम्हाला आनंदाची खरी कल्पना विसरून जायला लावतात," असे तिने स्पष्ट केले.
काजोल-ट्विंकलचा एक्स बॉयफ्रेंडचा 'सिक्रेट' खुलासा!
ट्विंकलने जेव्हा "बेस्ट फ्रेंड्सने एकमेकांच्या एक्सना डेट करू नये" असे विधान केले, तेव्हा एक अत्यंत मजेशीर क्षण आला. काजोलला मिठी मारून ट्विंकल म्हणाली, "आमचा एक एक्स कॉमन आहे, पण आम्ही सांगू शकत नाही!" यावर काजोलने लगेच "शट अप!" म्हणत ट्विंकलला थांबवले आणि दोघीही खळखळून हसल्या. सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार अशा अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावलेला हा शो Amazon Prime Video वर दर गुरुवारी स्ट्रीम होतो. या शोने अगदी कमी वेळात तुफान लोकप्रियता मिळवली आहे.
