काय म्हणाले गोविंदा?
मीडियासोबत हेल्थ अपडेट शेअर करत गोविंदा म्हणाले,"मी खूप जास्त हार्ड वर्क केलं होतं. अति व्यायामुळे मला थकवा आला होता. योग आणि प्राणायाम चांगले आहेत. पण अतीप्रमाणात व्यायाम करणं चुकीचं आहे. व्यक्तिमत्तव अधिक चांगलं कसं होईल यासाठी मी प्रयत्न करत असतो. मला आता वाटतंय उत्तम पर्सनॅलिटीसाठी योग आणि प्राणायम सर्वोत्तकृष्ट आहेत. डॉक्टरांनी मला आता औषध दिली आहेत". यावेळी गोविंदा यांचा काळा टी-शर्ट, चॉकलेटी रंगाचं जॅकेट, जीन्स आणि काळा चश्मा असा लूक होता.
advertisement
Govinda Hospitalised : मोठी बातमी! अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल
गोविंदाचे खास मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल अभिनेत्याला रुग्णालयातून घेण्यासाठी गेले होते. सुनीता आहूजा एका लग्नासाठी गेल्याने ती येऊ शकली नाही, अशा माहिती यावेळी ललित बिंदल यांनी दिली. गोविंदा यांना मंगळवारी सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली. चक्कर, अशक्तपणा आल्यासारखं वाटत असल्याने गोविंदा यांनी मध्यरात्रीच ललितला बोलावून घेतलं होतं. आता गोविंदा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
धर्मेंद्र यांनाही आज डिस्चार्ज मिळाला असून गोविंदा यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्याचा आनंद गोविंदा यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. धर्मेंद्र यांच्याबाबत बोलताना गोविंदा म्हणाले,"मी त्यांना प्रणाम करतो". धर्मेंद्र आणि गोविंदा दोघेही सुपरस्टार रुग्णालयातून सुखरुप बाहेर पडल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करत आहेत.
