या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाचा येणार तिसरा भाग
बॉलिवूडच्या या सुपरहिट कॉमेडी चित्रपटातील प्रत्येक पात्राचा, प्रत्येक सीन आणि प्रत्येक डायलॉग आजही लोकांच्या मनात घर करुन आहे. परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचा 'हेरा फेरी' (2000) आणि 'फिर हेरा फेरी' (2006) या चित्रपटाचा तिसरा भाग 'हेरा फेरी 3' आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'फिर हेरा फेरी' च्या कथेचा सस्पेन्स ज्यावर संपला होता, तोच सस्पेन्स 'हेरा फेरी 3' मध्ये उलगडणार आहे. राजू, श्याम आणि बाबूरावची जोडी पुन्हा एकदा आपल्याला हसवण्यासाठी सज्ज आहे.
advertisement
मी बिहारची लेक... आमदार झालेल्या मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
राजू, श्याम आणि बाबूरावचा नवा धमाका
'फिर हेरा फेरी' चित्रपटाचा क्लायमॅक्स सर्वांना लक्षात आहे. यात अक्षय कुमार एका पूलाच्या रेलिंगवर लटकलेला दिसतो आणि खाली वेगाने वाहणाऱ्या पाण्यात काहीतरी फेकण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे, सुनील शेट्टी आणि परेश रावल सुपरस्टार अक्षय कुमारला फोन करत असतात. अक्षय एक हाताने पुल पकडलेला आणि दुसऱ्या हाताने सामान सांभाळत असतो. अशा परिस्थितीत फोन वाजत असतो, पण तो फोन उचलू शकेल का? सामान वाचेल का? हे रहस्य आता 'हेरा फेरी 3' मध्ये उलगडलं जाणार आहे.
2026 मध्ये रिलीज होणार हेरा फेरी 3?
'हेरा फेरी 3' खूप दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्याची प्रत्येकजण आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहे. या तिसऱ्या भागात देखील अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल एकत्र दिसणार आहेत. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. पण नुकत्याच एका मुलाखतीत, परेश रावल यांनी संकेत दिला की, हा चित्रपट 2026 च्या पहिल्या सहा महिन्यात रिलीज होऊ शकतो. त्यामुळे 'हेरा फेरी 3' 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे, पण यासाठी कोणतीही अधिकृत तारीख अजून निश्चित झालेली नाही.
