TRENDING:

'जिलबी' गोड नाय पण गुढ नक्की, स्वप्निल आणि शिवानीचा नवा सिनेमा कसा वाटला मुंबईकरांना? VIDEO

Last Updated:

नववर्षाची सुरुवात झाल्यानंतर अर्थातच नवनवीन मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याच आज जिलबी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : नववर्षाची सुरुवात झाल्यानंतर अर्थातच नवनवीन मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आतापर्यंत मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी आणि संगीत मानपमान यासारखे दोन तगडी स्टार कास्ट असलेलले चित्रपट आतापर्यंत जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाले आहे. त्याच आज जिलबी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. स्वप्निल जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे यांसारखी कलाकार मंडळी असलेला हा चित्रपट आहे. पहिल्या दिवशी चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया लोकल 18 च्या प्रतिनिधीने जाणून घेतल्या आहेत.

advertisement

उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण आणि चांगल्या विषयाची निवड निर्माते आणि  दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा जिलबी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित गोड आणि गूढ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या जिलबी चित्रपट आहे.

advertisement

Coldplay Band Net Worth : 18, 19 आणि 21 जानेवारीला कोल्डप्लेच्या 'तालावर नाचणार' मुंबई; पण या बँड मेंबरची कमाई माहितीय का?

View More

हा चित्रपट खरंतर एक गुढ आणि सस्पेन्सचा अनुभव सर्वांना देतो. स्वप्नील जोशी यांचे काम कमाल आहे. आता चित्रपटात नेमकी काय मिस्टी आहे, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट नक्की पहावा, असं प्रेक्षकाने सांगितलं. स्टोरी चांगली आहे. थ्रिलिंग आहे. स्वप्नील जोशी यांचे काम चांगले आहे, असंही एका प्रेक्षकाने सांगितलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
सर्व पहा

थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्यांच्या संमिश्र मांडणीच्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे जिलबी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मनोरंजनाच्या या जिलबीचा खुसखुशीतपणा वाढवला आहे. जिलबी चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'जिलबी' गोड नाय पण गुढ नक्की, स्वप्निल आणि शिवानीचा नवा सिनेमा कसा वाटला मुंबईकरांना? VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल