बुधवारी जया बच्चन आणि पापाराझी पुन्हा एकदा समारोसमोर आले. जया बच्चन यांनी पापाराझींना चांगलंच झापलं. 'बदतमीजी मत करो, मुंह बंद रखो' असं म्हणत जया बच्चन पापाराझींवर चांगलाच भडकल्या. जया बच्चन त्यांची मुलगी श्वेता बच्चनसोबत एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथे नेहमीप्रमाणे पापाराझींनी त्यांना घेरलं आणि फोटो काढायला सुरुवात केली. हे पाहून जया संतापल्या आणि त्यांनी लगेच पापाराझींना फटकारले.
advertisement
( जया बच्चनकडून सचिन पिळगांवकरांच्या या मराठी चित्रपटाचं भरभरून कौतुक; OTT वर आहे ट्रेडिंग नंबर 1)
जया बच्चन व्हाइट कलरचा ड्रेस आणि मास्क घालून कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. जया बच्चन यांना पाहून पापाराझींनी फोटो घ्यायला सुरूवात केली. त्यांचा नेहमी सारखा आरडा ओरडा सुरू झाला. आजूबाजूच्या आवाजामुळे जया बच्चन खूप संतापल्या. त्या चालता चालता मध्येच थांबल्या आणि पापाराझींकडे पाहत राहिल्या. त्या पापाराझींच्या खोड्या पुढ्यात गेल्या आणि त्यांना चार शब्द सुनावून मग कार्यक्रमाला निघाल्या.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की जया बच्चन प्रचंड संतापल्या आहेत. त्या पापाराझींच्या दिशेने जातात त्यांच्याकडे बोट करत त्यांना म्हणतात, "तुम्ही लोक फोटो काढा, उद्धटपणा करू नका. गप्प बसा, तोंड बंद ठेवा आणि फोटो काढा... बस्स. आणि मग तुम्ही कमेंट करत राहता."
पापाराझी आणि जया बच्चन यांचा छत्तीसचा आकडा असल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय. पापाराझी जेव्हा केव्हा जया बच्चन यांचे फोटो काढततात तेव्हा त्या अस्वस्थ होतात. त्या मीडिया फ्रेंडली नाहीत असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे.
काही काळापूर्वी जया बच्चन त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट 'व्हॉट द हेल नव्या' वर "लाइमलाइट अँड लेमन्स" या एपिसोडमध्ये आल्या होत्या. सेलिब्रेटींचे रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "ते जे क्लिक करतात किंवा रेकॉर्ड करतात आणि जे दाखवतात या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांना हे स्वातंत्र्य आहे पण माझ्या स्वातंत्र्याचे काय? मला माहित आहे की काही लोक जाणूनबुजून अशा कमेन्ट करतात कारण त्यांनी माझ्याकडून रिअँक्शन मिळेल. नंतर चर्चा होईल, नंतर भांडण होईल. काही सेलिब्रिटी अशा गोष्टींवर खूप भर देतात."
