TRENDING:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीकडून 60 वर्षीय महिलेची फसवणूक, लुबाडले 1.17 कोटी रुपये

Last Updated:

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Actress : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने 60 वर्षीय व्यक्तीची सातव्यांदा फसवणूक केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Actress : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मसुमी मेवावाला सध्या चर्चेत आहे. मसुमी मेवावालाने 60 वर्षीय व्यक्तीची सातव्यांदा फसवणूक केली आहे. तसेच बनावट कागदपत्रे तयार करण्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे. बांगूर नगर पोलिसांनी 60 वर्षीय व्यक्तीला समोसा-वडापाव फ्रँचायझी योजनेतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून 1.17 कोटी रुपये लुबाडल्याप्रकरणी अभिनेत्री मसुमी मेवावाला आणि इतर दोन जणांना अटक केली आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील अभिनेत्री मसुमी मेवावाला यांच्यावर सातव्यांदा बनावटगीरीचा आरोप झाला आहे.
News18
News18
advertisement

संबंधित ज्येष्ठ नागरिक तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेले तेव्हा ही बाब उघडकीस आली. "माझ्या पतीला अटक होऊन त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. २०२२ मध्ये मी पतीला भेटायला जेलमध्ये गेले असता त्याने माझी ओळख राजेश मेवावाला यांच्याशी करून दिली. आठवड्याच्या भेटीदरम्यान मेवावालांनी मला त्यांच्या पत्नी राक्षी, मुलगी मसुमी आणि मुलगा भार्गव यांची ओळख करून दिली. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे एक चांगली गुंतवणूक योजना आहे," असे तक्रारदाराने सांगितले.

advertisement

मुलगी आणि मुलगा तक्रारदाराच्या घरी जाऊन योजनेबद्दल बोलले. "ते माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की त्यांचा एक खाजगी फूड चेन व्यवसाय आहे आणि ते समोसा-वडापाव पुरवतात. मी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली तर मला दररोज नफा मिळेल. त्यांच्या आमिषाला भुलून मी 2022 मध्ये 25 लाख रुपये गुंतवले", असे तक्रारदाराने सांगितले.

advertisement

तक्रारदाराला सुरुवातीला नफा मिळाला. "ही त्यांची कार्यपद्धती आहे. हे कुटुंब दररोज दोन हजार रुपये नफ्याच्या स्वरूपात जमा करत असे. त्यातून पीडित व्यक्तीला आणखी गुंतवणूक करायला प्रवृत्त केले जाई. त्यानंतर पीडिताने एकूण 1.17 कोटी रुपये गुंतवले. कुटुंबाने नंतर पैसे देणे बंद केले आणि फोन बंद केले,” असे पोलीस म्हणाले.

2023 मध्ये राजेश मेवावाला यांना जामीन मिळाला. "जामीन मिळाल्यावर ते माझ्या घरी आले आणि म्हणाले की मसुमी आणि भार्गव यांनी पैसे घेतले आहेत. पण त्यासाठी कुठलेही करारनामे नाही. करार झाला की सर्वांना पैसे परत मिळतील, असे त्यांनी सांगितले. 2024 मध्ये आम्ही सर्व पीडितांनी राजेश यांच्यासोबत कर्ज करार केला. मात्र आम्हाला काहीच पैसे मिळाले नाहीत आणि शेवटी पोलिसांकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही,” असे त्या 60 वर्षीय महिलेने सांगितले.

advertisement

पोलिसांच्या मते, मेवावाला कुटुंबाचे लक्ष्य प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक असत. “ते प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, विशेषतः महिलांना लक्ष्य करत. शहरात सात गुन्हे राजेश आणि मसुमी यांच्याविरुद्ध नोंदवले गेले आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत,” असे पोलिसांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दगडूशेठ बाप्पाला 21 पालेभाज्यांची आरास, चतुर्थीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा Video
सर्व पहा

मेवावाला कुटुंबाला 28 नोव्हेंबरला परळमधून अटक करण्यात आली. राजेश मेवावाला (55), भार्गव मेवावाला (23) आणि मसुमी मेवावाला (33) यांच्यावर महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शिअल एस्टॅब्लिशमेंट्स अॅक्ट, 1999 तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीकडून 60 वर्षीय महिलेची फसवणूक, लुबाडले 1.17 कोटी रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल