मैथिली ठाकूरचा व्हिडीओ व्हायरल (Maithili Thakur Video)
विजयानंतरचा मैथिली ठाकूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लेकीच्या विजयामुळे भावूक झालेली आईदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी मैथिली आनंदाने आपल्या आईचे आनंदाश्रू पुसताना दिसत आहे. तसेच तिचे कुटुंबिय विजय... विजय म्हणत आपला आनंद साजरा करत आहेत. या मोठ्या विजयामुळे एकंदरीतच मैथिलीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
मी बिहारची लेक... आमदार झालेल्या मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
कोण आहे मैथिली ठाकूर?
प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरचा जन्म बिहारमधील मधुबनी जिल्ह्यामधील बेनीपट्टी या गावी झाला आहे. तिचे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीत शिक्षक असल्याने त्यांनी तिला लहानपणापासूनच लोक संगीत आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं. मैथिलीच्या घरातील वातावरण संगीतमय असल्याने तिला लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. गायिकेचे ऋषव आणि अयाची हे दोन भाऊ तबला आणि हार्मोनियम वाजवतात. सुरुवातील मैथिली आपल्या भावांसोबत व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असे. तिचे हे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आणि तिला एक वेगळी ओळख मिळाली.
मैथिली पुढे 'रायझिंग स्टार' या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. त्यानंतर तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपलं गाणं सादर करण्याची संधी मिळाली. आता मैथिली राजकारण आणि गायन दोन्हीची सांगड कशी घालणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. देशभरातून मैथिलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
