अर्जुन कपूरसोबत पॅकअपच्या चर्चा सुरू असताना मलायका पुन्हा एकदा एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तो मिस्ट्री मॅन कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मलायकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
( नवऱ्याला बघून लोक म्हणायचे 'गोल्ड डिगर', 2 महिनेही टिकणार नाही, पण 3 वर्ष थाटात संसार करते अभिनेत्री )
advertisement
शनिवारी रात्री मुंबईतील एमएमआरडीए ग्राउंड्सवर झालेल्या ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायक एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टमध्ये मलायका दिसली होती. जिथे ती एका 'मिस्ट्री मॅन'सोबत डान्स एन्जॉय करताना दिसली.
कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत डान्स करत गप्पा मारताना दिसत आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा या व्हिडीओनंतर सुरू झाल्या आहेत.
कॉन्सर्टमध्ये मलायकाचा ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. व्हाइट कलरच्या फिटेड टँक टॉपमध्ये मलायका बोल्ड दिसत होती. कॉन्सर्टमधील मलायकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मिस्ट्री मॅन कोण आहे यावर अनेक तर्क लावले आहेत. एका युझरने लिहिलंय, "शेवटी मलायकाने तिची चॉइस बदलली. एक हँडसम हंक पटवला. अरबाज आणि अर्जुन पेक्षा हा चांगला आहे. तर काहींनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगितल आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा तो मिस्ट्री मॅन तिचा मॅनेजर असल्याचं म्हटलं आहे.
चाहत्यांनी घेतली मलायकाची बाजू
काही ट्रोलर्सनी मलायकाची बाजू घेतली आहे. एका युझरने लिहिलंय, जर 52 वर्षांचा पुरूष एखाद्या मुलीला डेट करत असेल तर काही गोंधळ होत नाही पण एका 50 वर्षांच्या महिलेने असं केलं तर ट्रोल केलं जातं.
