रुचितानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्यानं पोस्ट लिहित रोहित आर्यबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. मराठी मालिका सिनेमांत काम करणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता आयुष संजीव याने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "घटनेच्या केवळ दोन दिवस आधी माझी रोहित आर्यशी भेट झाली होती. त्याने मला त्याच्या आगामी 'लेट्स चेंज 4' या चित्रपटात एका भूमिकेची ऑफर दिली होती. त्यावेळी त्याने सांगितलेली कथा आणि नंतर जे काही घडले त्या घटनेशी मिळती जुळती होती. ही संपूर्ण घटना माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप धक्कादायक आहे."
advertisement
"मी त्याला 8-9 वर्षांपासून ओळखतो. ती त्याच्याबरोबर सिनेमा केला होता. त्या ओळखीमुळे मला त्याच्या हेतूंवर शंका घेण्याचे काहीच कारण वाटले नाही."
आयुषने शेवटी सांगितलं, "जे काही घडले आहे ते अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे आहे. मी वर्कशॉपमध्ये त्या मुलांनाही भेटले होतो आणि त्यांच्यासोबत काही फोटोही काढले होते. तेव्हा सर्व काही अगदी सामान्य वाटत होते. सुदैवाने, ती सर्व मुलं सुरक्षित आहेत."
