पूजा बिरारीने काय उखाणा घेतला?
पूजा बिरारीने उखाणा घेतला की,"घडलं सगळं अचानक, थोडी भांबावले, कळलंच नाही कसं व्हावं व्यक्त, आपसूकच या नात्यात गुंतत गेले, कारणही होतं तितकंच मस्त, एकेकाला भेटावं म्हणून माणसांची केली वाटणी, सगळ्यात आधी लौकिकला भेटले कारण म्हणे तोच आहे सोमची आद्य पत्नी. घराखाली भेटायला येतेस का म्हणून सोहमने मला गंडवलं. थेट आईसमोर नेऊन बसवलं. माझ्या मनातली हुरहुर त्यांनाही जाणवली. त्याच म्हणाल्या काही काळजी करू नकोस. मलाही कळत नाही आहे कसं व्हावं रिअॅक्ट. म्हटलं आताच एका पेजवर आहोत. आता आयुष्यभर राहु असंच. पुढे भेटले आजीला दोघी बिचाऱ्या आम्ही एकमेकींकडे नुसत्या बघतच राहिलो. भीती वाटली जाम, पटकन पाया पडले आणि सटकले तिथून. पुसला कपाळावरचा घाम".
advertisement
पूजा पुढे म्हणाली,"अरे बघु तरी दे कोण आहे मुलगी असं म्हणून बाबांशी व्हिडीओ कॉलवर झालं बोलणं. त्यावेळेपासूनच मनात कोरलं गेलं त्याचं ते गोड हसणं. अगदी तुडुंब मित्रांपासून भावंडांपर्यंत, आत्या-काकांपासून मामा-मावशींपर्यंत सगळेच आहेत भन्नाट. आंबट, गोड, तिखट, चमचमीत जणू पाणीपुरी चाट. होकार देत सोहमला आपलंसं केलं घर बांदेकरांचं. आज प्रसंगी नाव घेते साऱ्यांचं. महेश काका, स्वाती काकू, प्रार्थना ताई, सायली, मैत्रीयी ताई, रोहित दादा, प्रणिता काकू, नागेश दादा, संकल्प, अस्मिता दीदी, मीरा काकू, अवधूत भाई, पराग काकू, नागेश काका, उर्वी, आभा, आक्का आजी, भाग्यश्री ताई, राज, ओकांर दादा, प्रिया मावशी, तनू दिदी, अभिषेक दादा, ज्योती मामी, निकिता, विजू आजी, पूनम काकू, सिद्देश काका, क्रिश, यासोबत संपूर्ण बांदेकर आणि गुडेकर परिवाराला एकच घालते साद आयुष्यभर असंच असुदेत प्रेम आणि पाठीशी आशीर्वाद. बांदेकरांची सून म्हणून आले तरी मुलीचं नातं असेल कायम. माझ्या आईच्या विष्णुरुपी जावयाचं आज सगळ्यांच्या समक्ष नाव घेते सोहमचं".
पूजा आणि सोहमवर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज 2 डिसेंबर 2025 रोजी लोणावळ्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि सोहमच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
