हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यादवने सांगितले की, कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही. संपूर्ण घटनेबद्दल बोलताना राजपालची पत्नी राधा म्हणाली की ते सध्या सर्व परिस्थितींना एकत्र सामोरं जात आहेत. त्यातून ते पुढे येत आहेत. दरम्यान, राजपाल यादवने तुरुंगातल्या दिवसाबद्दल सांगितले की, "माझ्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबापासून दूर राहणे. त्या पलीकडे माझा एक रोजचा दिनक्रम असायचा. मी रोज सकाळी लवकर उठायचो, योगा आणि प्राणायम करायचो, मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी मेडिटेशन करायचो. माझी अजून कायदेशीर लढाई सुरू आहे आणि ती मला पूर्ण करायचीच आहे."
advertisement
राजपालने कायदेशीर बाबींवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, " गेल्या अनेक वर्षांपासून मी हा कायदेशीर लढा देत आहे. यातून मला कोणतीही पळवाट काढायची नाही. मला वाटतंय की, संपूर्ण प्रकरण कायदेशीर रित्या हाताळणेच योग्य राहिल." अभिनेत्याच्या पत्नीनेही या प्रकरणावर भाष्य केलंय. राधा यादवने असं म्हटलंय की, " सर्व शक्य कायदेशीर आणि सन्माननीय पर्यायांचा विचार करण्यात आला. कधीकधी उपाय केवळ इच्छाशक्तीवरच नाही तर वेळेवर देखील अवलंबून असतो." राजपाल यादव म्हणाले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी थेट माझ्या भाचीच्या लग्नासाठी शाहजहांपूरला आलोय. अभिनेत्याचे भाचीच्या लग्नातील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राजपाल यादव यांनी इंडस्ट्रीकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दलही मुलाखतीमध्ये भाष्य केले. तो म्हणाला, "मला मिळालेल्या प्रेमाबद्दल संपूर्ण बॉलिवूडचे मी आभारी आहे. या काळात मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे लोकांचा विश्वास. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी, आदर, वेळ दिलात. माझं दु:ख तुम्ही ऐकलंत, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे." राजपाल यादवच्या पत्नीने सांगितले की, या कठीण काळात अनेक लोकांनी त्याची चिंता व्यक्त केली आणि त्याला प्रोत्साहन दिले. राधा म्हणाली की तिला मिळालेल्या सर्व पाठिंब्याबद्दल ती आभारी आहे.
