TRENDING:

Rakhi Sawant : मम्मी, मला माफ कर..! आईच्या आठवणीत ओक्शाबोक्सी रडली राखी सावंत, BBच्या घरात फोडला हंबरडा

Last Updated:

Rakhi Sawant : दिवंगत आईला फोन लावला आणि हॅलो म्हणताच राखीनं हंबरडा फोडला. राखीनं यावेळी तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या राखी सावंत धिंगाणा घालतेय. पण या धिंगाण्यामध्ये बिग बॉसने असा ट्विस्ट आणला की सगळ्यांना हसवणाऱ्या राखीच्या आयुष्याची दुसरी बाजू प्रेक्षकांना आणि घरातील सदस्यांना पाहायला मिळाली. बिग बॉसने आपल्या जवळच्या व्यक्तींना फोन करायला सांगितला. दिवंगत आईला फोन लावला आणि हॅलो म्हणताच राखीनं हंबरडा फोडला. राखीनं यावेळी तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. तिचं बालपण, वडिल, बॉलिवूड, नवरा, फसवणूक या गोष्टी तिनं सांगितल्या.
News18
News18
advertisement

राखी म्हणाली, मम्मी कुठे आहेस तू, मला माफ कर, मी तुझ्याविरोधात लग्न केलं. मला माफ कर, मी कधीच चुकी नाही करणार. मी लास्ट बिग बॉसमधून बाहेर निघाले, मी तुला सांगून निघाले होते की मी बिग बॉसमध्ये जातेय. तू ध्यान ठेवं, तू का नाही ठेवलं? तुला माहिती होतं मी येणार.

( Bigg Boss Marathi 6 : सगळ्यांना रडवणारी राखी प्रभूसाठी ढसाढसा रडली; मिठी मारली आणि म्हणाली, 'मी तुझ्यासाठी...' )

advertisement

तू परमनंट गेली. मी खूप एकटी आहे मम्मी. तू मला सांगत होती हा मुलगा बरोबर नाही, चांगला नाही. तू तुझ्या आयुष्याचं, भविष्याचं वाटोळं केलं आहेस. आमचं नाव खराब केलंस. सॉरी मम्मी. मी बिग बॉसमध्ये गेली. तुझं कोणीच ध्यान ठेवलं नाही. मला कोणीच नाहीये सांगायला. तुला मी किती वेळा फोन केले पण तू माझा फोन का नाही उचलत गं. तू गेलीस बाबा गेले. तू खूप दु:ख सहन केलंस. आम्हाला मोठं केल, आम्हाला शिक्षण दिलं, मला बॉलिवूडमध्ये साथ दिली, बाबानी नाही दिली. तुला आणि मला घरातून हाकलून लावलं होतं आई. पूर्ण खानदानाने हकलून दिलं आपल्याला पण तू माझी साथ दिली मम्मी. तू मला पाहिले मम्मी. सॉरी मम्मी, सॉरी मा. आय लव्ह यू.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

राखी बिग बॉस मराठी 4 मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आली होती. हा सीझन करून ती बाहेर गेली तेव्हा तिची आई खूप सीरियस होती. ती कॅन्सरशी झुंज देत होती. काही दिवसांतच तिच्या आईचं निधन झालं. बिग बॉसमध्ये येताना तिनं तिच्या नवऱ्याकडे आईच्या उपचारांसाठी 10 लाख रुपये दिले होते. काम कर्तव्य पुढे ठेवून राखीनं नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अनेक लोक तिला ओळखायला चुकतात. मज्जा मस्ती करणारी राखी, वाद घालणारी राखी याच्यामागे एक मुलगी आहे. जिने आपल्या परिवारासाठी खस्ता खाल्ल्या, असं म्हणत बिग बॉसने आम्हाला राखीचा अभिमान असल्याचं सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rakhi Sawant : मम्मी, मला माफ कर..! आईच्या आठवणीत ओक्शाबोक्सी रडली राखी सावंत, BBच्या घरात फोडला हंबरडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल