रणबीरच्या गाण्यांमधील सगळ्यात पहिलं गाणं म्हणजे 'ये जवानी है दिवानी' सिनेमातील 'कबीरा'. फिल्मच्या क्लायमॅक्समध्ये कल्की कोचलिनच्या लग्नाचा सीन आहे. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये दुरावलेले नैना आणि कबीर अनेक वर्षांनी एकत्र आले होते. तेव्हा नैनाच्या होणाऱ्या नवऱ्याला तो बघतो. मंडपातून बाहेर पडताना 'कबीरा' हे गाणं वाजतं. यात त्याचा अभिनय कमी पण डोळे जास्त भावतात.
advertisement
रणबीरचं असंच एक दुसरं गाणं म्हणजे 'ए दिल ए मुश्किल' सिनेमातील 'चन्ना मेरे या'. अयान ( रणबीर)चं अलीझावर ( अनुष्का ) वर खरं प्रेम असतं. पण अलीझा त्याला फक्त बेस्ट फ्रेंड म्हणून पाहत असते. तिच्या आयुष्यात तो महत्त्वाचा असतो पण जोडीदारा इतका नाही. अलीझाच्या अलीशी ( फवाद खान ) लग्न करते.
अलीझाच्या लग्नात हाताला मेहेंदी लावून रणबीरची एन्ट्री होते. जिच्यावर आपलं प्रेम आहे ती दुसऱ्याची होताना पाहून मनात होणाऱ्या वेदना रणबीरने त्याच्या डोळ्यांतून दाखवल्या आहेत. तुटलेलं पण तरीही जिवंत असलेल्या प्रेमाच्या भावना तो डोळ्यांतून दाखवतो. 'चन्ना मेरे या' हे गाणं आजही कित्येक तरुणांच्या मनाचा ठाव घेत डोळ्यांत पाणी आणतं.
2011 साली आलेल्या 'रॉकस्टार' सिनेमातील 'कुन फाया कुन' हे देखील रणबीरच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक गाणं आहे. मनाचा ठाव घेणारं हे गाणं आहे. आपल्या आयुष्यातल्या प्रेम, अपयश आणि वेदनेत हरवलेला, स्वतःची ओळख शोधणारा, गोंधळलेला रणबीर ( जॉर्डन ) हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यात पोहोचतो. तिथे 'कुन फाया कुन' हे गाणं वाजतं आणि रणबीरला त्याच्यातील हरवलेला तो सापडतो. या संपूर्ण गाण्यात रणबीरचे डोळे शब्दांपेक्षा जास्त बोलतात.
