TRENDING:

Dhurandhar: अक्षय खन्नाच्या एन्ट्रीची सोशल मीडियावर क्रेझ, पण कुठून आली ही स्टेप? आयकॉनिक डान्सचं सत्य अखेर समोर

Last Updated:

Dhurandhar Movie: अक्षय खन्ना केवळ अभिनयामुळेच नाही, तर 'FA9LA' या एंट्री साँगवरील त्याच्या डान्समुळे तो सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे!

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' चित्रपट धुमाकूळ घालत आहे. एका बाजूला रणवीर सिंग लीड रोलमध्ये असला तरी, सगळी वाहवा अक्षय खन्ना लुटून नेत आहे. या चित्रपटात अक्षयने साकारलेला 'रहमान डकैत' हा कुख्यात गँगस्टर प्रेक्षकांना अक्षरशः थरथर कापायला लावत आहे. पण अक्षय खन्ना केवळ अभिनयामुळेच नाही, तर 'FA9LA' या एंट्री साँगवरील त्याच्या डान्समुळे तो सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे!
News18
News18
advertisement

कराचीतील दहशतीचा चेहरा

'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाने मुख्य खलनायक रहमान बलोच ऊर्फ रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. कराचीच्या गल्लीगल्ल्यांत एकेकाळी ज्याची दहशत होती, त्याच्या क्रूर कहाणीला अक्षयने मोठ्या पडद्यावर भीषणपणे जिवंत केले आहे.

अक्षय खन्नाचा अभिनय इतका प्रभावी आहे की, अनेकांना तो रणवीर सिंगसह इतर सर्व कलाकारांवर भारी पडताना दिसतो. सोशल मीडियावर चाहते वास्तविक रहमान डकैतपेक्षाही अक्षय खन्ना अधिक भयानक वाटत असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

advertisement

चित्रपटात अक्षय खन्नाची एंट्री बहरिनचा हिप-हॉप सेन्सेशन फ्लिप्पराची याच्या 'FA9LA' या दमदार ट्रॅकवर होते आणि यातील त्याचे डान्स मूव्ह्स व्हायरल झाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, अक्षय खन्नाचा हा व्हायरल डान्स आधी होणार नव्हताच! अक्षयचा सह-कलाकार दानिश पँडोर याने 'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत हे रहस्य उघड केले.

अक्षय खन्नाच्या आयकॉनिक एन्ट्रीमागील Unknown Story!

दानिशने सांगितले, "आम्ही हे गाणे लेह-लडाखमध्ये शूट करत होतो. विजय गांगुली हे कोरिओग्राफी करत होते. आदित्य सर अक्षय सरांना शॉट समजावत असताना, अक्षय सरांनी अचानक विचारले, 'मी डान्स करू शकतो का?' तेव्हा आदित्य सरांनी 'तुम्हाला जे आवडेल ते करा' असे सांगितले."

advertisement

दानिश पुढे म्हणाला, "पुढच्याच टेकदरम्यान आम्ही सगळे एंट्री करत असताना, अक्षय सरांनी इतर सगळ्यांना डान्स करताना पाहिले आणि ते स्वतःहून डान्स करू लागले. त्यांच्यासाठी कोणतीही कोरिओग्राफी नव्हती! शॉट संपल्यावर सगळेजण अवाक झाले आणि टाळ्या वाजवू लागले. फ्रेम खूप सुंदर दिसत होती. त्यांनी हे सर्व स्वतः केले. ते खरंच जबरदस्त आहेत."

advertisement

4 दिवसातच धुरंधरची 100 Cr क्लबमध्ये एन्ट्री

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर स्थिर, कांद्यामध्ये पुन्हा घसरण, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होऊन अवघ्या चार दिवसांत सुमारे १२६ कोटी रुपयांची कमाई करत १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar: अक्षय खन्नाच्या एन्ट्रीची सोशल मीडियावर क्रेझ, पण कुठून आली ही स्टेप? आयकॉनिक डान्सचं सत्य अखेर समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल