'KING' हा चित्रपट एक स्टाइलिश आणि जबरदस्त ऍक्शन एंटरटेनर आहे, जो स्टाइल,आणि थ्रिल नव्या पद्धतीने सादर करेल. सिद्धार्थ आनंदचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि मसालेदार चित्रपट मानला जात आहे, जो त्याच्या ऍक्शन स्टोरीटेलिंगला एका नव्या स्तरावर नेईल.
‘किंग’चं टायटल रिवील करत शाहरुख खानच्या वाढदिवसाची दणक्यात सुरुवात करण्यात आली आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदकडून फर्स्ट लूक आऊट करत चाहत्यांना एक रिटर्न गिफ्ट देण्यात आलं आहे. शाहरुखला किंग खान म्हटलं जातं. आता याच नावाचा चित्रपट घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील त्याचं पात्र फक्त भीती निर्माण करत नाही, तर दहशत पसरवतं. “शंभर देशांत बदनाम, जगाने दिलं फक्त एक नाव” – ‘किंग’ हा त्याचा चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
शाहरुख खान खरोखरं “दिलों के बादशाह”आहे. चित्रपटातील शाहरुखचा लुक खूपच खतरनाक आहे. चंदेरी केस, ईयररिंग्स आणि यापूर्वी कधीही न पाहिलेला स्टायलिश अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘किंग’ हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
