TRENDING:

साऊथ स्टार फहाद फाझीलला मराठी नाटकाची भुरळ! थेट महेश मांजरेकर-भरत जाधवची घेतली भेट, VIDEO VIRAL

Last Updated:

Fahadh Haasil Promote Mahesh Manjrekar Play: 'शंकर-जयकिशन' या नाटकाला साऊथ सुपरस्टार फहाद फाझीलनेही शुभेच्छा दिल्या आहेत!

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मराठी रंगभूमीसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे! कॉमेडीचा बादशहा भरत जाधव आणि चित्रपटसृष्टीचे पावर हाऊस महेश मांजरेकर हे दोन दिग्गज कलाकार 'शंकर-जयकिशन' या नाटकातून पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. विशेष म्हणजे, महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर या नाटकाद्वारे रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. या हटके नाटकाची तालीम थेट हैदराबादमध्ये सुरू असून या नाटकाला साऊथ सुपरस्टार फहाद फाझीलनेही शुभेच्छा दिल्या आहेत!
News18
News18
advertisement

वडील-मुलीचं गुंतागुंतीचं नातं

'शंकर-जयकिशन' या नाटकाची कथा वडील-मुलीच्या नात्यातील गुंतागुंत आणि अनेक वर्षांपासून दडलेली कटुता यावर आधारित आहे. या नात्यात अचानक एका अनोळखी व्यक्तीची एन्ट्री होते. हा तिसरा माणूस नेमका कोण आहे? तो त्यांच्या आयुष्यात का येतो? त्याच्या येण्यामागे काही गूढ रहस्य दडलेले आहे का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना नाटकात मिळणार आहेत.

advertisement

दिग्दर्शक सुरज पारसनीस यांच्या मते, हे नाटक केवळ हसवणारे नाही, तर मैत्री आणि पित्याच्या नात्यातील अदृश्य धाग्यांना स्पर्श करणारे आहे.

बायोपिक बनवण्याच्या नावाखाली घातला गंडा! 30 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी विक्रम भट्ट गोत्यात, पोलिसांनी केली अटक

फहाद फाझीलने दिल्या शुभेच्छा

या नाटकाच्या टीमला नुकतीच एका मोठ्या कलाकाराकडून दाद मिळाली आहे. सुपरस्टार फहाद फाझील यांनी नाटकाच्या टीमला भेट दिली. फहाद फाझील अचानक कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पोहोचला आणि त्याने नाटकाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, "मी हे नाटक नक्कीच पाहायला येण्याचा प्रयत्न करेन!" यावर महेश मांजरेकर मिश्किलपणे म्हणाले, "आम्ही तुला सबटायटल्स दाखवू शकणार नाही, पण आशा आहे की तुला आमचं नाटक नक्की आवडेल." त्यावर फहादचे आत्मविश्वासपूर्ण उत्तर आले, "नक्कीच मला समजेल, कारण भावना शेवटी सारख्याच असतात." फहादसारख्या मोठ्या स्टारने नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याने टीमचा आनंद द्विगुणित झाला आहे.

advertisement

Palash-Smriti : 'त्यांना मी सोडणार नाही', स्मृतीने लग्न मोडताच पलाश मुच्छलने दिली धमकी! थेट कायदेशीर कारवाई करणार

टीमने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "जेव्हा फहाद फासिल म्हणतोय 'I want to watch it', तेव्हा तुम्ही मिस करून कसं चालेल? ज्यांच्या अभिनयाचे आपण सगळेच फॅन आहोत, त्या फहाद फासिलला ओढ लागलीये आपल्या 'शंकर जयकिशन' नाटकाची! यापेक्षा मोठा आनंद तो काय? Thank you, FaFa!"

advertisement

हैदराबादमध्ये तालीम का?

दरम्यान, 'शंकर-जयकिशन' या नाटकाची तालीम मुंबई-पुण्यात न होता, थेट हैदराबादमध्ये सुरू आहे. याच कारण म्हणजे, महेश मांजरेकर सध्या हैदराबादमध्ये एका महत्त्वाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. नाटकावर परिणाम होऊ नये म्हणून, टीमने थेट हैदराबादमध्ये मुक्काम हलवला आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये आणि सेटवर ही जोरदार तालीम सुरू आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: कांदा, मक्याचे दर पुन्हा घसरले, रविवारी सोयाबीनला किती मिळाला भाव
सर्व पहा

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित, विराजस कुलकर्णी लिखित आणि सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकात भरत जाधव, महेश मांजरेकर आणि शिवानी रांगोळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे या नाटकाचा शानदार शुभारंभ होणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
साऊथ स्टार फहाद फाझीलला मराठी नाटकाची भुरळ! थेट महेश मांजरेकर-भरत जाधवची घेतली भेट, VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल