सूरज आणि संजना यांच्या लग्नाआधीच्या सगळ्या विधी मोठ्या थाटामाटात पार पडल्या. लग्नाआधी पायापडणीच्या सोहळ्यात सूरज चव्हाणची घोड्यावरून वरात काढण्यात आली. त्यानंतर दोघांचा मेहंदी सोहळा देखील जोरदार पार पडला. लग्नाच्या दिवशी हळदी आणि वरातीतही सूरज आणि संजना दणकून नाचताना दिसले.
advertisement
लग्न लागलं, संजनाने सूरजच्या नव्या घरात गृहप्रवेश देखील केला. सूरजच्या घरी संजनाच्या रुपाने लक्ष्मी आली. नव्या घरी आलेल्या लक्ष्मीचं सगळ्यांनी जोरादर स्वागत केलं. लग्नानंतर जागरण गोंधळ घालण्याची प्रथा असते. सूरज आणि संजना यांच्या लग्नानंतरही त्यांच्या घरी जागरण गोंधण घालण्यात आला. या जागरण गोंधळाचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यात सूरज चव्हाण आणि त्याची बायको संजना जानू विना करमत नाय या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
समोर गोंधळाची पूजा मांडण्यात आली आहे. घरात सगळे नातेवाईक जमले आहेत. पूजेबरोबर मागे संभळ वाजत आहे. संभळाच्या ठेक्यावर जानू बिना करमत नाय हे गाणं गायलं आहे. या गाण्यावर सूरज आणि संजना त्यांच्या स्टाइलनं नाचत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सूरज चव्हाणची बायको संजना त्याला डान्स करण्यात टफ फाइट देते. संजनाच्या घाण्याचा कार्यक्रम, लग्नाची वरात आणि आता गोंधळाच्या कार्यक्रमालाही हे पाहायला मिळालं. सूरज आणि संजना यांच्या लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
